विज पुरवठा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी हातेडसह परिसरात विजेचा लपंडाव काल्पनिक फाईल चित्र चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकव...
विज पुरवठा सुरळीत करण्याची ग्रामस्थांची मागणी हातेडसह परिसरात विजेचा लपंडाव
![]() |
| काल्पनिक फाईल चित्र |
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
हातेडसह परिसरात सध्या विज वितरण कंपनीची जोरदार चर्चा सुरू असून घरगुती विज ग्राहकांना सबस्टेशन मार्फत जाणुन बुजुन त्रास दिला जात असल्याचे बोलले जात आहे याबाबत अधिक माहिती अशी की सध्या आपणास वातावरणामुळे बदल पाहायला मिळत असून जणू काही या बदलाचा पुर्ण फायदा विज वितरण कंपनी घेत आहे थोडी जरी हवा आली किंवा पाऊस झाला तरी विज निश्चितच दोन तिन तास गायब होते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे यामुळे
हातेडसह परिसरात हातेड सबस्टेशन सध्या चर्चेत आहे पाऊस आला की विज जाणं काही विशेष नाही परंतु पाऊस येवो न येवो विज मात्र गायब झालेली असतेच इतकं नाही तर दोन अडीच तास गायब असते तर कधी कधी लगातार दोन पाच मिनिटांत बंद, सुरू, बंद, सुरू केली जाते यामुळे ईले.वस्तूचे नुकसान झाल्यास विज वितरण कंपनी जबाबदार राहिल व विज वितरण कंपनी कडून याची वसूली करू अशीही चर्चा ऐकायला मिळत आहे तर विज न माहिती देता गेली किंवा कंपनीच्या मार्फत मेसेज न आल्यास व एका तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास एक तासाला ५० रुपये याप्रमाणे वसुली रक्कम विज बिलात माफ करावेत परिसरातील सुज्ञ नागरिक विज वितरण कंपनी कडे अशी मागणी ही करण्यात येणार आहे यामुळे हातेड सबस्टेशन सध्या परिसरात जोरदार चर्चेत आहे

No comments