adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कोण आहेत डॉ.राहुल गेठे ?? सलग तिसऱ्यांदा सकाळ सन्मान पुरस्कार पटकवलेले एकमेव व्यक्तिमत्व

  कोण आहेत डॉ.राहुल गेठे ?? सलग तिसऱ्यांदा सकाळ सन्मान पुरस्कार पटकवलेले एकमेव व्यक्तिमत्व  मुंबई वृत्तान्त (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सल...

 कोण आहेत डॉ.राहुल गेठे ??

सलग तिसऱ्यांदा सकाळ सन्मान पुरस्कार पटकवलेले एकमेव व्यक्तिमत्व 


मुंबई वृत्तान्त

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सलग तिसऱ्यांदा सकाळ सन्मान पुरस्कार पटकवलेले एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.राहुल गेठे, चला तर जाणुन घेऊयात डॉ.राहुल गेठे म्हणजे नक्की आहेत तरी कोण ??

माजी मुख्यमंत्री आणि आताच्या घडीचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे 'ओएसडी' असलेल्या डॉ. राहुल गेठे हे आता नवी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आहेत. अनधिकृत डान्सबार असलेल्या अतिक्रमणांवर बेधडक कारवाई करून आधी शिंदे सरकारमध्ये दरारा वाढवलेल्या डॉ. राहुल गेठें मुळे डान्सबारमालकांना चांगलीच धडकी भरली आहे.

डॉ. राहुल गेठे हे राजकीय वर्तुळात चर्चेत आले. शिंदे 'मुख्यमंत्री' होताच डॉ. राहुल गेठे हे त्यांचे 'ओएसडी' झाले. तेव्हाच, डॉ. राहुल गेठेंनी 'सीएमओ' त आपली छाप पाडली आणि शिवसेनेसह इतर पक्षांतील आमदारांसोबत संबंध वाढवले. या सरकारच्या काळात घडलेल्या चांगल्या-वाईट घडामोडीत डॉ. राहुल गेठेंनी आपली कामगिरी ठळक केली. त्यामुळेच 'सीएमओ' म्हणजे, डॉ. राहुल गेठे हे समीकरण दिसून आले. याच काळात सीएमओ पाठोपाठ डॉ. राहुल गेठे यांच्याकडे नवी मुंबई महापालिकेच्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. या पदावर बसतानाच डॉ. गेठेंनी शहरातील अतिक्रमणांना टार्गेट केले आणि ती जमीनदोस्त करण्याचा सपाटा लावला.तसेच अनधिकृत डान्सबार्स जमिनदोस्त करण्यात डॉ. राहुल गेठेंची महत्वाची भुमीका राहिली.

काही काळापुर्वी त्यांना जिवे मारण्याचा धमक्या सुद्धा आलेल्या होत्या पण डॉ.राहुल गेठे यांनी कुठल्याही धमक्यांना भिक न घालता आपले काम जोमाने सुरू ठेवले;तसेच पुण्यात पोर्श प्रकरण घडताच बेकायदा विशेषतः अमली पदार्थ, डान्सबार आणि रात्री-अपरात्री सुरू राहणाऱ्या हॉटेलवर कारवाईचा पवित्रा घेत, एकनाथ शिंदेंनी काळे धंदे बंद करण्याची ताकीद प्रशासनाला दिली. याचा फायदा उठवून डॉ. राहुल गेठेंनी नवी मुंबई महापालिकेतील बेकायदा डान्सबार पाडले. त्यावरून संतापलेल्या डान्सबार मालकांनी थेट मुख्यमंत्री शिंदेंना भेटून, डॉ. राहुल गेठेंच्या वर्किंग स्टाइलवर बोट ठेवले. त्यानंतर आपल्या पध्दतीने कारवाई सुरू ठेवून डॉ.राहुल गेठेंनी बारमालकांना धडा शिकवला. हेच डॉ.राहुल गेठे पुढे जाऊन नवी मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्त झाले त्यामुळे डॉ. राहुल गेठे या नावामुळे बारमालकांची नशा उतरली आहे हे नक्कीच.

No comments