इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राज्यशासन अभ्यासक्रम परवानगी असताना सी.बी.एस.इ.अभ्यासक्रम शिकवत असल्याची तक्रार. एरंडोल प्रतिनिधी - (संपादक -:...
इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राज्यशासन अभ्यासक्रम परवानगी असताना सी.बी.एस.इ.अभ्यासक्रम शिकवत असल्याची तक्रार.
एरंडोल प्रतिनिधी -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
एरंडोल येथील इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये राज्यशासन अभ्यासक्रम शिकवण्याची परवानगी असताना सी.बी.एस.इ.अभ्यासक्रम शिकवत असल्याची तक्रार गटशिक्षणाधिकारी यांच्या कडे पालकांनी केली आहे.
तक्रारीत एरंडोल येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाची इंग्लिश मिडीयम स्कूल आहे.या शाळेत राज्यशासनाचा अभ्यासक्रम शिकवण्याची परवानगी असताना देखील सी.बी.एस. इ.अभ्यासक्रमाची पुस्तके घेण्यासाठी भाग पडले जात असून याचा अतिरिक्त आर्थिक भार पालकांवर पडत असल्याची तक्रार ज्योती सिद्धेश महाजन या पालकांनी गटशिक्षणाधिकारी एरंडोल यांच्या कडे केली आहे.तसेच या कारणामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाचा मोठा तणाव येत असून माझी मुलगी शाळेत जाण्यास इच्छुक नसल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.त्यामुळे तिचे शैक्षणिक नुकसान होत असून शिक्षणाचा अधिकार नुसार सदर बाब विद्यार्थ्यांवर अन्याय कारक असून या शाळेत १ली ते ८ वी या वर्गाला सी.बी.एस. इ.अभ्यासक्रम शिकवला जातो व ९ वी ते १० वी या वर्गाला राज्यशासन अभ्यासक्रम शिकवले जात असून १० वी च्या वर्गाला मंडळ मान्यता मिळाली नसल्याने विद्यार्थ्यांना संस्थेच्या रा.ती.काबरे विद्यालयातून बसवले जात असून सदर बाब नियम बाह्य असल्याचे म्हटले आहे.शेवटी वरील सर्व बाबींची तत्काळ चौकशी करावी अन्यथा उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे.
No comments