महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप अजीजभाई शेख / राहाता (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील प्रवरानगर येथील...
महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात विद्यार्थिनींना गणवेशाचे वाटप
अजीजभाई शेख / राहाता
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील प्रवरानगर येथील महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने कन्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले.
महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात छत्रपती शाहू महाराज यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापिका नलिनी जाधव, उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, उपप्राचार्य अलका आहेर, पर्यवेक्षिका संगीता सांगळे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे यांनी केले. कन्या विभागातील सर्व शिक्षकांनी व प्रवरानगर येथील सचदेव क्लॉथ सेंटरचे मालक प्रवीणशेठ सचदेव यांच्यामार्फत विद्यालयातील शिक्षणात प्राविण्य आणि गरीब, होतकरू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप प्राचार्य विनायक मेथवडे, मुख्याध्यापक नलिनी जाधव, दिलीप डहाळे, संगीता सांगळे, अलका आहेर आदींच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी निखिल मांजरे नैतिक सोनवणे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्राचार्य मेथवडे यांनी सामाजिक न्याय दिन व शाहू महाराजांच्या चरित्रावर आधारित आपले मनोगत व्यक्त केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा वर्गशिक्षिका अश्विनी सोहोनी यांनी आपल्या मनोगतातून शाहू महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी संजय ठाकरे, डॉ. शरद दुधाट, बाबासाहेब अंत्रे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा उपक्रम राबविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना गणवेश देण्यासाठी माधुरी वडघुले, संगीता उगले, प्रफुल्ल नव्हाळे, विजयश्री कदम, सुजाता ठाकरे, नंदादेवी बैसाने, कमल थिटे, मीनाक्षी गांगुर्डे, दिपाली आंबेकर, शैलजा सातपुते, विलास गभाले यांनी विशेष परिश्रम घेतले व योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय भालेराव यांने केले तर करण टाचतोडे याने आभार मानले.
वृत्त विशेष सहयोग
डॉ.शरद दुधाट- श्रीरामपूर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments