कुख्यात गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी दरोड्याची पूर्व तयारी करतांना आवळल्या मुसक्या चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोप...
कुख्यात गुन्हेगारांना चोपडा शहर पोलिसांनी दरोड्याची पूर्व तयारी करतांना आवळल्या मुसक्या
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा शहर पोलीस स्टेशनचे कार्यक्षेत्रात अज्ञात इसम दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आलेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनादिनांक-२५/०६/२०२५ रोजी रात्री २२/४५ वा.चे सुमारास मिळालेल्या गुप्त बातमी नुसार चोपडा शहर पोलिसांनी मामलदे शिवारात चोपडा ते चुंचाळे रोडवर शिताफीने मोटर कार क्र-एम.एच.१४ ए एस ७९०५ या अंधारात निर्जन स्थळी थांबलेल्या मोटर कारचा शोध घेवुन तिच्यातील ६ इसमांना ताब्यात घेतले.सदर वाहनामध्ये लोखंडी टॉमी,मिरची पुड,दोर हे घरफोडी व जबरी चोरी करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य मिळुन आले.एकदरीत सदर इसम काहीतरी गुन्हेगारी कृत्य करण्याच्या उद्देशाने सदर ठिकाणी थांबले असल्याचा संशय बळावल्याने नुमद इसमांचे काही गुन्हेगारी रेकार्ड आहे का याची तपासणी केली असता त्यापैकी ३ इसमांवर खुन,दरोडा,जबरी चोरी,खंडणी,दंगल,आर्म अॅक्ट अशां गंभीर स्वरुपाचे गुन्हे पुणे येथील पिंपरी चिंचवड व निगडी या पोलीस ठाण्यामध्ये दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे.पिंपरी चिचंवड पोलीसांना संपर्क केला असता नमुद इसम हे कुख्यात व अतिशय धोकादायक गुन्हेगार असल्याची माहिती दिली.सदर इसम हे दरोड्याची तयारी करुनच चोपडा येथे थांबल्याचे निष्पन्न झाल्यावरुन त्यांचे ताब्यातील मोटर कार,मोबाईल फोन,रोख रक्कम,लोखंडी टाँमी,मिरची पुड, दोर असा एकुण १०,८१,०००/-रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांचे विरुध्द चोपड़ा शहर पोलीस ठाणे गुरन-३९१/२०२५ बी एन एस कलम ३१० (४) ३१० (५) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्हयाचा तपास सपोनि एकनाथ भिसे हे करीत असून मिळुन आलेल्या इसमांपैकी ३ इसम हे अल्पवयीन असल्याने त्यांना बालन्यायमंडळ जळगांव येथे पाठविण्यात आले असून उर्वरीत ३ इसम नामे तुषार उर्फ तुषल्या गौतम झेंडे वय-२५ वर्ष रा.उर्वल सोसायटी निगडी पिंपरी चिचंवड जि.पुणे,विनोद राकेश पवार वय-२५ वर्ष रा.दत्तनगर चिंचवड जि.पुणे,सुनिल गोरख जाधव वय-३० वर्ष रा.दत्तनगर चिंचवड जि.पुणे यांना अटक करुन दि-२६/०६/२०२५ रोजी चोपडा न्यायालय यांचे कडे हजर केले असता त्यांना दि-२९/०६/२०२५ रोजी पावेतो पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली आहे.
नमुद आरोपी पैकी विनोद राकेश पवार याचे वर पिंपरी पोलीस ठाणे पुणे येथे खुन,घरफोडी,दरोडा जबरी चोरी,आर्म अॅक्ट,दंगल असे गंभीर स्वरुपाचे १० गुन्हे दाखल असुन तुषार गौतम झेंडे याच्यावर निंगडी पो.स्टे.तसेच पिंपरी पोलीस ठाणे येथे खुन, घरफोडी,दरोडा जबरी चोरी,आर्म अॅक्ट असे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत तसेच सुनिल गोरख जाधव याच्यावर दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत.सदर टोळीचा दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याचा प्लॉन चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार अशांनी हाणून पाडला आहे.सदरची कामगीरी डॉ महेश्वर रेडी पोलीस अधिक्षक जळगाव,याचे मार्गदर्शनाखाली व अण्णासाहेव घोलप उपविभागीय पोलीस अधिकारी चोपडा,उपविभाग याचे सुचना प्रमाणे पोलीस निरिक्षक मधुकर साळवे,सपोनि एकनाथ भिसे,सफौ दिपक विसावे,जितेंद्र सोनवणे,पोहेकॉ संतोष पारधी,पोहेकाँ ज्ञानेश्वर जवागे,पोहेकाँ लक्ष्मण शिगाणे,पोहेकाँ हर्षल पाटील,महेंद्र साळुके,पोना संदिप भोई,पोकॉ विनोद पाटील,पोकॉ निलेश वाघ,पोकॉ प्रकाश मथुरे,प्रमोद पवार,गजेंद्र ठाकुर अशांनी केली आहे.

No comments