विद्यार्थी प्रवेश दिनानिमित्त वावडदा शाळेत विद्यार्थ्यांना गोड पदार्थांचे वाटप वावडदा (ता.जि. जळगाव) प्रतिनिधी (संपादक-:- हेमकांत गायकवाड)...
विद्यार्थी प्रवेश दिनानिमित्त वावडदा शाळेत विद्यार्थ्यांना गोड पदार्थांचे वाटप
वावडदा (ता.जि. जळगाव) प्रतिनिधी
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
विद्यार्थी प्रवेश दिनानिमित्त वावडदा येथील माध्यमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात प्रवेश दिला गेला. यानिमित्ताने शाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना गोड पदार्थांचे (साखरपारे, लाडू इत्यादी) वाटप करण्यात आले. या उपक्रमात *ॲड धनंजय खेवळकर* तसेच *ॲड. विजय जयकर* यांनी विशेष सहभाग घेतला व मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत फुलांनी व ओवाळणीने केले. शिक्षणाचा पहिला दिवस संस्मरणीय ठरावा, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात आले.
*ॲड. विजय जयकर* यांनी आपल्या भाषणात मुलांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांनी सांगितले की, "शिक्षण हेच खरं शस्त्र असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही मोठे ध्येय ठेवून पुढे जावे."

No comments