निसर्गाचे प्रचंड वरदान लाभलेले पाटण तालुक्यातील आडदेव गांव काय सांगू...आणि कसे सांगू.... पाटण तालुक्यात आडदेव असे एक गाव आहे की ते निसर्ग...
निसर्गाचे प्रचंड वरदान लाभलेले पाटण तालुक्यातील आडदेव गांव
काय सांगू...आणि कसे सांगू....
पाटण तालुक्यात आडदेव असे एक गाव आहे की ते निसर्गसृष्टी ने अती सुंदर केले केले आहे.मी ईश्वर न माननारा माणूस आहे.. पन ज्या सोमय्या देवालयात हा कार्यक्रम झाला ते इतके सुंदर आहे की मला तिथलं प्रसन्न वातावरण पाहून ,मन भरून आले... मी लंडनला गेलो..मॉरिशस येथे गेलो.. तिथले निसर्गाचे रूप पाहिले..लंडनला तर समरला ६ ते ९ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान खाली आलेले पाहिले, तिथली सतत भरून वाहणारी नदी पाहिली... जगण्याची शैली पहिली आणि शिस्त देखील..पण का कुणास ठावूक काल या डोळ्याने आडदेव चे सौंदर्य पाहिले तेंव्हा असे वाटले की माझा भारत काही कमी नाही. सह्याद्रीच्या डोंगररांगा मध्ये आपली जी संस्कृती आहे तिचे स्वतःचे एक वेगळेपण आहे.. सुख दुःख ,काम क्रोध सर्वांना आहेच..पण इथला निसर्ग न्यारा आहे...कोण श्रद्धेने वैष्णोदेवी करते,कोण कोकणात जाते,गोवा देखील मी पाहिला,...पण हे असे ठिकाण आहे जिथे शांती मिळते...समाधी लागते...गावकरी आणि अनेक हातानी या मंदिराचे काम पूर्ण केले आहे.. हा कळस मला पॅगोडा सारखाच. वाटला. हे मंदिर पाहून माझ्या मनात अनेक विचार आले..की माणसाने श्रद्धेने जोपासलेला नीतिमान ईश्वर हा एक मनाचा उन्नत. आविष्कार आहे... प्रयत्न. तर करायचे आहेतच..पण आपल्याला जे मिळते ते हा निसर्ग देतो...हाच ईश्वर देतो कदाचित ही कृतज्ञता त्यात असावी. आपण ईश्वर मानत असलेल्या लोकांना सर्रास अज्ञानी कदापी ठरवू नये.. नीती,प्रेम,सदाचार पालन ईश्वर मानून जे करत असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे..आणि तसे आयुष्यभर माणूस काही देव घेऊन बसत नाही.पण देवाच्या निमित्ताने माणसे सुख शांती ,प्रेम,आपुलकी जिव्हाळा देत घेत असतील तर चांगली गोष्ट आहे. संतानी देव ,ईश्वर मानून सदाचार ,नैतिकता याच गोष्टी समाजास दिल्या आहेत..ही भक्ती ईश्वराची असली तरी सदाचार आणि माणुसकी या गोष्टी सोबत असतील तर अधिकच चांगली सत्कर्म घडून येते.. अंधश्रद्धा नकोच .अखेरीस स्वतःचे मन हेच ईश्वर आहे...त्याला जसे ठेवू तसे ते राहते...आपण पराधीन आहोत ही जाणीव पूर्वीच्या माणसांनी ठेवली त्यामागे एक शहाणपण मला जाणवते.. मानवी जीवनात होणारी स्थित्यंतरे, अनित्यता ही. साक्षर नसलेल्या माणसाला जाणवली नसेल असेही नाही..निसर्गाच्या सानिध्यात सतत निरीक्षण करत माणसाला एक दृष्टी. मिळालेली असणार ... ईश्वराच्या निमित्त साधून सुख दुःख. संवाद करण्यासाठी ही सर्व माणसे. एकत्र येत असतील.आपल्या मुलाचे, जनावरांचे, शेतीचे काय चालले आहे,हवा पाणी कसे आहे, याची विचारणा ते सतत करीत आली आहेत.. यांचं मंदिरात त्यांनी किर्तन, प्रवचन ,भारुडे यातून मनाला बोध घेतला असणार.. देवाची चरित्रे ऐकली असतील.. बुवांच्या ,महाराज यांच्याविषयी आदर सुरवातीस असणार..आजही ते दिसते... अशातच सारी माणसे सारखी नाहीत..पुन्हा वय वाढेल तशी बुद्धीला फूट फुटणे साहजिकच... सुबुद्धीन,दुर्बुद्धी ,नैतिक अनैतिक निकष यातूनच तयार झाले... आणि समूह गट नुसार वेगळेपण ,कधी अंधश्रद्धा देखील श्रद्धा म्हणून पाळणे साहजिकच असते... होते...शिक्षणं मिळत जाते तसे सत्याच्या जवळ जाण्याचा मार्ग मिळतो..नव्हे तो मिळायला हवा असतो...अशा या विविधांगी पर्यावरणात परंपरेचा सहवास गावाला मिळतो..त्यामुळे श्रद्धाशी निगडीत राहते.त्यात पुन्हा रूढी परंपरा जात व्यवस्था यांचा प्रभाव असेल तर तेही संस्कार. माणसावर होत जातात..पण शिक्षणं आणि वाचन वाढले की देश कळतो.. देशाचे संविधान. कळते.. परंपरा या श्रद्धेला वाहून नेतात,पण प्रत्येक श्रद्धा ही वाईट असतेच असे नाही.. तर शिक्षणं जागृती हक्क आणि कर्तव्य या नव्या गोष्टी शिकवत जातात... त्यामुळे तिथे पुन्हा माणूस. वेगळा .. बनतो आज धर्मांधता पसरवली जाते संस्कृती म्हणून तेंव्हा पुढे ती श्रद्धा होते..श्रद्धेची चिकित्सा माणूस आपल्या पूर्वजांच्या प्रति आदर असल्याने करत नाही..आणि त्यामुळेच मग तशी मने घडविली जातात... हे चिंतन आडदेव इथे गेल्यामुळे मनात आले.. जगन्नाथ गायकवाड यांनी जो माझा गाव प्रकाशन समारंभ गावी सोमनाथ. मंदिरात ठेवला होता... त्यामुळे तिथे गेल्यानंतर उंचावरून निसर्ग सृष्टी पहायला मिळाली ..सुंदर मंदिर ,सुंदर गाभारा,जिज्ञासू श्रोते...आणि कवी यांचे गावकरी ...खरेच पुन्हा सांगतो.की प्रेमात पडावे असा हा निसर्ग आहे...मला असे वाटले देखील की पुढच्या काळात हे आडदेव .. पर्यटन स्थळ होईल... विपश्यना करायला गेलेल्या साधकास जो शांतीचा अनुभव येतो तसा इथे येतो. इगतपुरी ला हा अनुभव मी घेतला होता.. अगदी तसाच आनंद मला मिळाला...
एखाद्या अनुभवाने सगळे जीवन ,सगळा देश कळत नाही..पण तिथे सातत्याने पडणारा पाऊस,यामुळे जीवनशैली देखील वेगळी आहे..अलिकडे म्हातारे लोक लवकर होतात.. औषध गोळ्या खाणे हेच जीवन झाले आहे,अशावेळी शेतात नियमित कष्ट करून अन्न धान्य पिकवणारी ही शेतकरी मंडळी या निसर्गाशी एकरूप होऊन गेली आहेत .त्यामुळेच त्यांचे आयुर्मान देखील चांगले आहे..८० वर्षाचे अनेक लोक खणखणीत ,आणि तरुण. असल्याचे पाहिल्यावर एक समाधान. मिळते..आपली निसर्ग जीवनशैली ,त्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत करते..शिक्षण घेतलेले अनेक लोक पुन्हा आपल्या गावात येतात तेंव्हा त्यांना सुकून. मिळतो..
अशा या गावाचे नाव मला खूप आवडले.. आडदेव...
चेवत्याच्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले हे आडदेव .. डोंगरात उंचावर आहे.. नवा रस्ता, कोयना नदी .पूल .आंब्रोळी,करत करत उंच ठिकाणी असलेल्या आडदेवला पोचलो ,तेंव्हा वाटले जगन्नाथ गायकवाड हे ८० वर्षाचे तरुण आपल्या छत्रपती शिवाजी कॉलेजला या गावातून केवळ कविता देण्यासाठी छत्रपती शिवाजी कॉलेजला कसे आले असतील?..या वयात केवढा उत्साह..आणि त्याच्यावर प्रेम करणारी माणसे देखील न्यारी...सध्या पेरण्या चालू आहेत म्हणून संध्याकाळी माझं.गाव. या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ...अगदी मंदिराच्या चौसोपी हॉल मध्ये सर्व लहान थोर बसलेले... ॲड.उत्तमराव पाटील आलेले.. वकील मंडळी आलेली... या गावातील एक प्राध्यापक देखील सुंदर बोलले...सुभाषचंद्र हायस्कूल येथे शिक्षण. घेतलेल्या विद्यार्थ्यांची मनोगते किती सरळ आणि साधी भूतकाळ उभा केला त्यांनी.. ॲड चंद्रकात गायकवाड ,त्यांच्या पत्नी आणि मुले व्यवस्थापन. पाहत होती.सूत्रसंचालन करता करता आलेल्या सर्व अतिथीना नारळ, शाल दिली जात होती...हा कौटुंबिक सोहळा नव्हता गावाबद्दल कृतज्ञता होती. जगन्नाथ गायकवाड यांनी आपल्या मातीला भाळ लावून केलेला नमस्कार हे यातील विशेष होते. .कवी सदाचारी , परखड आणि संत तुकाराम महाराज यांच्यासारखा रोख ठोक ..तितकाच करुणाशील,क्रियाशील,माणसे जोडणारा... या स्मरणभातून एक जाणवले ...माणूस माणूस मेळवावा,मानवता धर्म वाढवावा हे ब्रीद खऱ्या अर्थाने साकार झाले होते...एक ठरवले आता....संविधानाच्या स्वप्नातल गाव उभे रहायचे असेल तर प्रथम गाव नीट समजून घेतले पाहिजे... आडदेवने मला श्रद्धांची घृणा न करता श्रद्धा,आणि हेतू. समजून घेण्याची आणि भेटतील त्या माणसाचे नीट आकलन करून घेण्याची कल्पना दिली आहे..आणि ती घेऊन पुढे जायचे आहे.. जुने एक गीत आठवले... बस्ती बस्ती , परबत परबत गाता जाये बंजारा लेकर दिल का इक तारा...
लेखन:
प्रा.डॉ.सुभाष वाघमारे (सर)
छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा -
9890726440
प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111

No comments