कुपोषित बालकांसाठी साकळीचे सरपंच दिपक पाटलांकडून केली अतिरिक्त आहाराची व्यवस्था भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...
कुपोषित बालकांसाठी साकळीचे सरपंच दिपक पाटलांकडून केली अतिरिक्त आहाराची व्यवस्था
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
साकळी ता.यावल । येथीलडॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरातील ' संस्कार ' अंगणवाडी शाळेच्या कार्यक्षेत्रात कुपोषित बालकापैकी सॅम श्रेणीतील २ बालके, मॅम श्रेणीतील ६ बालके , SUW श्रेणीतील २ बालके व २ बालके आजारी अशी १२ बालके अंगणवाडी शिक्षिका मंगला नेवे यांच्या लक्षात आली होती.या लहान मुलांना या आजारातून बरे करण्यासाठी सौ.नेवे मॅडम यांनी गेल्या मे आणि जून या दोन महिन्यात १०८ नंबर ला काॅल करुन या सर्व मुलांना जळगाव ला सिव्हीलला नेले.त्यांच्यावर तेथे योग्य असे उपचार करण्यात आले. आता त्यांची तब्येत चांगली आहेत.दरम्यान ही सर्व मुले अतिशय गरीब घरातील व मोलमजुरी करणाऱ्या पालकांची असल्याने त्यांना योग्य अशा आहाराची गरज होती.व त्या आजारातून त्यांना बरे करणे गरजेचे होते.यासंबंधी सौ.नेवे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून सरपंच दिपक पाटील यांना माहीती दिली.या कुपोषित व विविध श्रेणीतील बालकांना अतिरिक्त सकस आहार द्यावा लागेल यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून व्यवस्था करून द्या अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी सरपंच दिपक पाटील यांच्याकडे केली.सरपंच दिपक पाटील यांनी मुलांच्या अतिरिक्त सकस आहारासाठी योग्य ती तरतूद करून या बालकांसाठी अतिरिक्त आहारात रोज प्रत्येकी एक अंडे, गुळ, शेंगदाणे , खजुर आणि पोषण आहारात खोबरेल तेल असा तब्बल एक महिना पुरेल अशा आहाराची व्यवस्था करून दिली.सरपंच दिपक पाटील यांच्या लहान बालकांच्या आरोग्य हितासाठी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे.
No comments