Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वर्डी येथे शोभाबाई राजेंद्र पाटील यांची सरपंच पदी निवड

  वर्डी येथे शोभाबाई राजेंद्र पाटील यांची सरपंच पदी निवड   प्रतिनिधी रविंद्र कोळी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वर्डी येथील सरपंच कल्पना महें...

 वर्डी येथे शोभाबाई राजेंद्र पाटील यांची सरपंच पदी निवड  


प्रतिनिधी रविंद्र कोळी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वर्डी येथील सरपंच कल्पना महेंद्र पाटील यांनी मौखिक करारानुसार ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी सरपंच पदासाठी नुकतीच निवडणूक दिनांक १७रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी छायाबाई दिलीप पाटील व शोभाबाई राजेंद्र पाटील यांनी अर्ज दाखल केले, सतरा सदस्यांच्या उपस्थितीत निवडणूक अधिकारी अजय बारेला तसेच तलाठी वर्डी एस एस महाजन यांच्या देखरेखित पार पडली. ग्रामविकास अधिकारी कुंदन कुमावत यांनी दप्तरी सहकार्य केले. सर्व १७ सदस्यांनी मतदान प्रक्रियेत भाग घेतला मतदान झाल्यावर दोघं महिला उमेदवारांना आठ-आठ सारखी मते मिळाली, तर एक मत बाद झाल्यामुळे दोघांची नावाची ईश्वर चिट्ठी टाकून अखेर शोभाबाई पाटील यांच्या नावाची निघाल्याने त्यांना विजयी घोषित केले. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस पाटील पद्माकरनाथ व आडावद पोलीस स्टेशनचे एपीआय प्रमोद वाघ, हवालदार विनोद धनगर, अतुल पाटील, संजय धनगर यांनी चौक बंदोबस्त ठेवला होता. नवनिर्वाचित सरपंच शोभाबाई पाटील यांचे माजी जि प सदस्य बाळासाहेब पाटील, माजी सभापती विनायक चव्हाण, कांतीलाल पाटील गजानन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

No comments