संत निवृत्तीनाथ पालखीचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान.. प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर (संपादक हेमकांत गायकवाड) संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ...
संत निवृत्तीनाथ पालखीचे मंगळवारी पंढरपूरकडे प्रस्थान..
प्रतिनिधी -जयवंत हागोटे त्रंबकेश्वर
(संपादक हेमकांत गायकवाड)
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ आषाढी पालखी सोहळा मंगळवारी त्रंबकेश्वर येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीनाथ संस्थान कडून सर्व तयारी करण्यात आली असून मंगळवारी दुपारी 2 वाजता त्र्यंबकेश्वर येथून विविध पूजा करून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ यांच्या पादुका चांदीच्या रथात ठेवण्यात आल्या आणि प्रस्थानाच्या मिरवणुकीत टाळ मृदांगणाच्या गजरात श्रींचे रथातून पंढरपूरकडे प्रस्थान झाली पालखी सोहळा हा अत्यंत वैभवशाली आणि परंपरेप्रमाणे नुसार आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालखी सोहळ्यात काही नवीन दिंड्या सहभागी झाल्या आहेत सोहळ्यात यंदाही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली पंढरपूर पर्यंत बैल जोड्या रथासाठी असून साधारण 30 हजार वारकरी पालखी सोहळ्या बरोबर चालणार आहेत.

No comments