राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन साजरा लोकशाही, पुरोगामित्व आणि सामाजिक न्यायाचा अभिमान..! चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हे...
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा २६ वा वर्धापन दिन साजरा
लोकशाही, पुरोगामित्व आणि सामाजिक न्यायाचा अभिमान..!
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सुनिल पाटील (वाळकी)मा. जि. प. सदस्य ह्यांच्या संपर्क कार्यालयात मा.चंद्रकला ताई पाटील सरपंच चहार्डी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
ह्या प्रसंगी मा. आमदार बापुसाहेब कैलास पाटील, मा. जि. प सदस्य सुनिल पाटील (वाळकी), श्री प्रवीण भाई गुजराती,श्री परेश देशमुख, श्री मिलिंद सोनवणे, नोमान काझी, तुकाराम बापु पाटील, जियोद्दीन काझी, सनी सचदेव, राजेंद्र धनगर,साळुंखे गुरुजी, दानिश शेख व ईतर उपस्थित होते. २६ वर्षांचा संघर्ष, सेवा आणि समर्पणाचा प्रवास १९९९ साली शिवरायांचे स्वराज्य, शाहूंची समता, फुल्यांचे सामाजिक परिवर्तन, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा जपत स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आज, २६ वर्षांनंतर आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणून दोन्ही भूमिकांमध्ये जनतेचा विश्वास संपादन करत राज्य आणि देशाच्या राजकारणात भरीव योगदान दिले.
🔰 नवा निर्धार, नव्या वाटचालीचा..!
या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी
➡️ महाराष्ट्राच्या सर्वांगीण, समतोल व शाश्वत विकासासाठी
➡️ युवकांना संधी, महिलांना सन्मान, शेतकऱ्यांना हक्क, आणि वंचितांना न्याय देण्यासाठी
➡️ लोकाभिमुख राजकारणाच्या मूल्यांवर ठाम राहून
भविष्यातील वाटचालीस नवा आयाम देण्याचा संकल्प करूया.
📣 "मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी..!"
हे फक्त घोषवाक्य नाही, तर एक विचार, एक दायित्व आणि एक सेवाभाव आहे..!
लोकशाही, पुरोगामित्व आणि सामाजिक न्यायाचा अभिमान..! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेला हार्दिक शुभेच्छा २६ वर्षांचा संघर्ष, सेवा आणि समर्पणाचा प्रवास १९९९ साली शिवरायांचे स्वराज्य, शाहूंची समता, फुल्यांचे सामाजिक परिवर्तन, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार यांचा वारसा जपत स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली. आज, २६ वर्षांनंतर आपण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष म्हणून दोन्ही भूमिकांमध्ये जनतेचा विश्वास संपादन करत राज्य आणि देशाच्या राजकारणात भरीव योगदान दिले.
🔰 नवा निर्धार, नव्या वाटचालीचा..!
या वर्धापन दिनानिमित्त आपण सर्वांनी
➡️ महाराष्ट्राच्या सर्वांगीण, समतोल व शाश्वत विकासासाठी
➡️ युवकांना संधी, महिलांना सन्मान, शेतकऱ्यांना हक्क, आणि वंचितांना न्याय देण्यासाठी
➡️ लोकाभिमुख राजकारणाच्या मूल्यांवर ठाम राहून
भविष्यातील वाटचालीस नवा आयाम देण्याचा संकल्प करूया.
"मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी..!"
हे फक्त घोषवाक्य नाही, तर एक विचार, एक दायित्व आणि एक सेवाभाव आहे..!
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २६ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेला हार्दिक शुभेच्छा..!



No comments