चोपडा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई कोंबून नेणाऱ्या उंटाची सुटका २९ लाखांचा मुद्देमाल जप्त चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपड...
चोपडा ग्रामीण पोलीसांची धडक कारवाई कोंबून नेणाऱ्या उंटाची सुटका २९ लाखांचा मुद्देमाल जप्त
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यात तिघ जणांना पोलिसांनी शिताफीने पकडून अटक केली तर जवळजवळ २९ लाखाचा मुद्देमाल हि जप्त करण्यात आला आहे. सदरील तिघे ही मध्यप्रदेशातील असून कत्तलीच्या इराद्याने उंटांना घेऊन जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून याबाबत चोपडा ग्रामीण पोलिसांच्या नाकाबंदी सुरू असतांना गोरक्षकांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे वाहनांची झाडाझडती घेण्यात आली होती यात दोन आयशर गाड्यांमध्ये उंटांना तोंडाला व पायाला निर्दयीपणे दोरीने बांधून गाडीत कोंबून घेऊन जात असल्याचे आढळून आले होते. यामधे १६ नरजातीचे तर २ मादी जातीचे उंट असून त्यांची एकत्रित किंमत जवळपास ९ लाख रुपये तर दोन आयशर ची किंमत २०लाख रुपये असा एकुण २९लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपी हरी नायक मोतीलाल नायक (वय ३५), खालील खान खलीत खान (वय ४०) सद्दाम फकरू बागवान या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याप्रकरणी पोकॉ घनश्याम पवार यांच्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलिसांत सी सी टी एन एस गुन्हा रजिस्टर क्रमांक १७३ / २०२५ प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११(१) (सी) ( डी) (एफ् )महाराष्ट्र अधिनियम संरक्षण अधिनियम ५(ए ,बी.) महाराष्ट्र पोलीस ऍक्ट११९ कायदा कलम मोटार वाहन कायदा कलम ८३ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पुढील तपास पोना.शशिकांत पारधी हे करीत आहेत.



No comments