नूतन मराठा महाविद्यालयात चैतन्यम योगा सेंटरचे उद्घाटन जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नूतन मराठा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ...
नूतन मराठा महाविद्यालयात चैतन्यम योगा सेंटरचे उद्घाटन
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
नूतन मराठा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय अकराव्या योग दिनाच्या औचित्य साधून चैतन्यम योगा सेंटरचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले नंतर होम कुंड प्रज्वलित करून विधिवत पूजा करण्यात आली,
सुरुवातीला ओम उच्चारणाने आजच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात करण्यात आली विविध 31 प्रकारचे योगा अभ्यासाची सुरुवात महाविद्यालयातील योगशिक्षिका प्राध्यापक शितल पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाने महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी केले, चैतन्यम योगा सेंटर महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांसाठी रोज सकाळी साडेसहा वाजेपासून फ्री मध्ये उपलब्ध करण्यात आले असून याचा परिसरातील लोकांनी तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी लाभ घ्यावा असे आव्हान प्राचार्य डॉ.एल. पी. देशमुख यांनी केलेले आहे दररोज योग अभ्यास महाविद्यालयातील योगशिक्षिका प्रा. शितल पाटील मॅडम घेणार आहे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयातील सर्व उपप्राचार्य, क्रीडाशिक्षक व सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.



No comments