adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न — ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन

  यावल येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न — ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- ...

 यावल येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न — ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन



भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

येणाऱ्या ७ जून रोजी साजरी होणाऱ्या मुस्लिम धर्मीयांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस स्टेशनच्यावतीने शांतता समितीची बैठक गुरुवारी सायंकाळी पोलीस स्टेशनच्या आवारात पार पडली. नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक श्री. रंगनाथ धारबळे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली.

या बैठकीस शहरातील विविध समाजघटकांचे प्रतिनिधित्व करणारे शांतता समिती सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत पोलीस निरीक्षक धारबळे यांनी सर्व नागरिकांना बकरी ईद हा सण पारंपरिक पद्धतीने व शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता समाजात सलोखा टिकवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

शांतता समितीचे जेष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील, पुंडलिक बारी यांनीही आपले मनोगत व्यक्त करताना समाजातील सर्व घटकांनी बकरी ईद शांततेत साजरी करावी असे आवाहन केले. कोणतीही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी सर्वांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे ते म्हणाले.

या बैठकीस शेख अलीम, विजय सराफ, संतोष खर्चे, अशपाक शाह, चेतन आढळकर, भूषण फेगडे, मुकेश कोळी, पराग सराफ, करीम मणियार, नईम शेख, सय्यद युनूस, सय्यद युसुफ, समीर खान, तसलीम खान, सलीम शेख फारुख, शेख मोहम्मद शफी, शेख हबीब मंजर यांसह इतर शांतता समिती सदस्य उपस्थित होते.

No comments