adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

वेळ लागणार नाही दुर्घटना घडायला ? कारण जुणे बांधकाम आले पडायला !!

 वेळ लागणार नाही दुर्घटना घडायला ? कारण जुणे बांधकाम आले पडायला !!  देवळाली प्रवरा आरटीओ शिबीर कॅम्पची जागा बदलावी - नागरीकांची मागणी  जावेद...

 वेळ लागणार नाही दुर्घटना घडायला ? कारण जुणे बांधकाम आले पडायला !! 

देवळाली प्रवरा आरटीओ शिबीर कॅम्पची जागा बदलावी - नागरीकांची मागणी 


जावेद शेख / राहूरी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात उपप्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) उपविभाग श्रीरामपूर या कार्यालयांतर्गत नागरिकांच्या विविध कामांसाठी आरटीओ शिबीर कॅम्प चे आयोजन करण्यात येत असते,परंतू या विश्रामगृहाच्या इमारतीची मोठी दुरावस्था झाल्याने सदरची इमारत कधी कोसळेल याचा भरोसा राहिलेला नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदरील ठिकाणच्या आरटीओ शिबीर (कॅम्प ची) जागा बदलावी अशी मागणी नागरिकांद्वारे करण्यात येत आहे. 

श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन (आर टी ओ) कार्यालयांतर्गत राहूरी तालुक्यातील नागरीकांसाठी वाहन चालविण्याचा परवाना,वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन) तसेच आर टी ओ अंतर्गत येणाऱ्या विविध कामांसाठी महिन्यातून दोनदा पंधरवाडा शिबीर (आर टी ओ) कॅम्प चे आयोजन देवळाली प्रवरा पाटबंधारे खात्याच्या विश्रामगृहात गेली अनेक वर्षांपासून केले जाते, तालुक्यातून नागरिक या साठी येतं असतात, पाटबंधारे खात्याच्या या विश्रामगृहाचे बांधकाम तब्बल एकशे तेवीस वर्षांपूर्वीचे (सन १९०२) आहे, ब्रिटीश कालीन या बांधकामाची सध्या मोठी दुरावस्था झाली आहे,संपूर्ण बांधकाम पडण्याच्या परिस्थिती मध्ये असून काही भागांचे पत्रेही गळूनही पडलेले आहेत, या ठिकाणी दर पंधरा दिवसांनी आरटीओ कॅम्पद्वारे शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याने वाहनं चालविण्याचा परवाना काढण्यासाठी महिला, तरुण, तरुणी,मुले यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो, तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी, नागरिक आपल्या विविध प्रकारच्या वाहनांचे नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यासाठी याठिकाणी गर्दी करत असतात,राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा या दोन्हीं गावाच्या मध्ये हे शिबीर होत असल्याने नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही,त्यावर सदरचे इमारत बांधकाम पडण्याच्या मार्गावर असल्याने कधी काहीही अनर्थ घडण्याची भिती व्यक्त होत असून सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने अधिकच नागरिकांना खबरदारी घ्यावी लागत असल्याने श्रीरामपूर प्रादेशिक परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे, राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यानं एखाद्या शासकीय किंवा निमशासकीय जागेवर शिबीराचे आयोजन केल्यास नागरिकांना यांचा फायदा होईल तरी परिवहन विभागाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. - वृत्त विशेष सहयोग,ज्येष्ठ पत्रकार रमेश बोरुडे,राहूरी, वृत्त प्रसिद्धी सहयोग समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -9561174111

No comments