Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सामान्य नागरिक व पोलीस विभाग समन्वय निस्वार्थ समाजसेवामुळे सन्मान

 पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गिरीश (गोविंदा) चौधरी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव,   सामान्य नागरिक व पोलीस विभाग समन्वय निस्वार्थ समाजसेवामुळे सन...

 पोलीस अधीक्षकांच्या हस्ते गिरीश (गोविंदा) चौधरी यांचा सन्मानपत्र देऊन गौरव,

 सामान्य नागरिक व पोलीस विभाग समन्वय निस्वार्थ समाजसेवामुळे सन्मान  


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

खिरोदा तालुका रावेर येथील गिरीश (गोविंदा) जनार्दन चौधरी यांना पोलीस अधीक्षक कार्यालय जळगांव येथे दि. 17/06/2025 रोजी  निस्वार्थ  समाजकार्य सहकार्य करत असतांना जनसेवेची भावना ठेऊन सावदा पोलीसांना सतत मदत करून पोलीस विभाग व समाजामध्ये एक चांगला ठसा उमटवला आहे या कार्या ची दखल पोलीस प्रशासन यांनी घेतली व त्यांना मा. पोलीस अधिक्षक श्री. डाँ. माहेश्वर रेड्डी सर यांच्या हस्ते सन्मान पात्र देऊन गौरवीत करण्यात आले.

गिरीश (गोविंदा)जनार्दन चौधरी यांच्या वतीने सर्व पोलीस प्रशासन सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चौधरी यांनी विविध समाजोपयोगी उपक्रमात सहभाग घेतला. गिरीश चौधरी यांनी सन्मान स्वीकारताना सर्व पोलीस प्रशासनाचे, तसेच विशेषतः विशाल पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले. या गौरवामुळे युवकांमध्ये समाजकार्यासाठी प्रेरणा निर्माण झाली असून, पोलीस आणि समाज यामधील बंध अधिक दृढ होण्यास हातभार लागणार आहे.

No comments