adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे कौमी एकता फाउंडेशन करणार गोवंश हत्या बंदी कायद्याबाबत जनजागृती

  फैजपूर येथे कौमी एकता फाउंडेशन करणार गोवंश हत्या बंदी कायद्याबाबत जनजागृती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:-हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील कौम...

 फैजपूर येथे कौमी एकता फाउंडेशन करणार गोवंश हत्या बंदी कायद्याबाबत जनजागृती


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:-हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील कौमी एकता फाउंडेशन चे नुकताच सभा पार पडली तसेच सभेच्या सुरुवातीला पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड अतिरिकी हल्ल्यात शहीद झालेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी राज्यात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची माहिती तसेच याची अमल बजावणी साठी परिसरात लवकरच मोहीम सुरू करणार असून यंदा या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मुभा दिलेल्या जनावरांचीच कुर्बाणी द्यावी असे सभे मध्ये सर्वानुमते ठरले आहे.शासनाने मुभा दिलेल्या जनावरांची कुर्बानी करतांना नियमावली चे पालन करावी याविषयी सोशल मीडिया च्या माध्यमातून तसेच फलक छापून जनजागृती करणार आहे. त्यांच्या या निर्णयाचा परिसरातून कौतुक होत आहे.या प्रसंगी संस्थे चे अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष  शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान,सय्यद असगर,सचिव सय्यद जावेद,आसिफ दादा मोहम्मद, जफर खान, कलीम खा, एड.शेख खालिद,जाबिर खान,शेख रफिक,शेख आसिफ,शेख आरिफ,शेख इद्रीस, हमीद शेख,शेख अकील, आदीसह उपस्थित होते.

No comments