adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

श्रीराम मंदिराची दानपेटी फोडणारा अवघ्या बारा तासाच्या आतच जेरबंद,नगर तालुका पोलिसांची सपोनी.प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

  श्रीराम मंदिराची दानपेटी फोडणारा अवघ्या बारा तासाच्या आतच जेरबंद,नगर तालुका पोलिसांची सपोनी.प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई स...

 श्रीराम मंदिराची दानपेटी फोडणारा अवघ्या बारा तासाच्या आतच जेरबंद,नगर तालुका पोलिसांची सपोनी.प्रल्हाद गीते यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि५):- नगर तालुक्यातील दहिगाव येथील श्रीराम मंदिरांची दानपेटी फोडणाऱ्या आरोपीस अवघ्या 12 तासाच्या आत जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. बातमीची हकीकत अशी की,

नागेश तुळशिराम वाघ (वय-36 वर्ष,धंदा-शेती व श्रीराम मंदीर ट्रस्ट अध्यक्ष,रा-दहीगाव,ता.जि अहिल्यानगर) यांनी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये असे म्हणले होते की दहीगाव ता.जि.अहिल्यानगर येथे सुमारे दीड वर्षापासुन श्रीराम मंदीर ट्रस्ट अध्यक्ष म्हणून काम करतो.सदर मंदीरात एक दानपेटी ठेवलेली आहे.दानपेटीत येणारे जाणारे भाविक दानपेटीमध्ये 5 रु,10 रु,20 रु,50 रु 100 पैसे असे स्वइच्छेनुसार टाकत असतात. सदर दानपेटी आम्ही दर तीन महीन्यांनी उघडीत असतो त्यामध्ये साधारणता सहा ते सात हजार रुपये पर्यंत रोख रक्कम दान पेटीत जमा झालेली असते. मागील दोन महीन्यापुर्वी दान पेटी उघडलेली होती.दि. 04/06/2025 रोजी सायं-7/00 वा.चे. गावातील मंदीरात देवदर्शनासाठी गेलो,व दर्शन वगैरे घेवुन मंदीरातील सभामंडपात ठेवलेली दान पेटी पाहीली असता दानपेटीला लावलेले कुलुप व्यवस्थीत होते. त्यानंतर श्रीराम मंदीराला असलेले दोन्ही दरवाजे लोटुन घेवुन माझ्या मी घरी झोपण्यासाठी गेलो. दि-05/06/2025 रोजी सकाळी 8/00 वा.चे. नेहमीप्रमाणे गावातील श्रीराम मंदीर येथे देवदर्शन करण्यासाठी गेलो होतो.तेथे गावातील इतरही लोक दर्शन करीत असताना लक्षात आले की,आमचे गावातील श्रीराम मंदीराचे सभामंडपात ठेवलेले दान पेटीचे कुलुप तुटलेले दिसले.त्यानंतर आमच्या गावातील इतर लोकांनी देखील दानपेटीचे कुलूप तोडलेले दिसलेबाबत सांगितले.त्यानंतर सर्वानी मिळुन आमचे गावातील दान पेटीतील पैशाचे चोरी झालेबाबत विचारपुस केली असता कोणाला काही एक माहीती नसल्याचे सांगितले. त्यानंतर माझी खात्री झाली की, आमचे गावातील श्रीराम मंदीरातील सभामंडपातील दान पेटीचे कुलुप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडुन त्यातील रक्कम चोरुन नेली आहे.6,300/रु. अंदाजे रोख रक्कम त्यात विविध दराच्या नोटा आहेत याप्रमाणे फिर्याद दाखल होताच नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी घटनास्थळी जाऊन बारकाईने पाहणी केली त्यानंतर सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गिते यांनी सोबत पथकातील अधिकारी कर्मचारी यांना योग्य त्या सूचना व मार्गदर्शन करून तांत्रिक तपास करून कारवाई करण्यास सांगितले.पोलीस पथक तपास करत असताना गणेश सोन्याबापू हंबर्डे (वय-25 वर्ष रा.दहिगाव ता.जि.अहिल्यानगर) याने चोरी केली असल्याचे तपासात निष्पन्न केले.सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, पोलीस उपनिरीक्षक भरत धुमाळ,सहाय्यक फौजदार रमेश गांगर्डे,पोलीस हेडकॉन्स्टेबल शरद वांडेकर,गणेश लबडे,नगर दक्षिण मोबाईल सेल विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केली आहे.

No comments