बापरे...तब्बल 1 कोटी 1 लाखांचा गुटखा जप्त..विशेष पोलीस पथकाची कारवाई..12 आरोपी गजाआड सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक-:- हेमकांत गायकवाड) अ...
बापरे...तब्बल 1 कोटी 1 लाखांचा गुटखा जप्त..विशेष पोलीस पथकाची कारवाई..12 आरोपी गजाआड
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक-:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि.१३):-अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोतुळ परिसरात एका पत्र्याच्या शेड मध्ये पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने छापा टाकला.यात हिरा पान मसाला 110 पोते, रॉयल 717 सुगंधी तंबाखु 50 पोते असा 1 कोटी 1 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई रविवार दि.13 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास केली. यामध्ये शोहेब शाबीद काझी (रा. कोतुळ,ता.अकोले),शाहीद हुसेन लतीफ पटेल (रा. कोतुळ, ता. अकोले),मतीन शबीर शेख (रा. कोतुळ,ता.अकोले),शहा नवाज जावेद काझी (रा.कोतुळ,ता. अकोले),परवेज युनूस शेख (रा. कोतुळ,ता.अकोले), साद अनवर तांबोळी (रा. अकोले), अतीक अनवर शेख (रा.समशेरपुर, ता. अकोले), शाहरुख जावेद काझी (रा. कोतुळ, ता.अकोले), सादिक पठाण (रा.अकोले), अमोल शरद जाधव (रा. अकोले), जुबेर युनुस शेख (रा. कोतुळ, ता. अकोले), इम्रान रौफ शेख (रा. कोतुळ, ता. अकोले) यांस आरोपी करण्यात आले आहे.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाचे परिविक्षाधिन उपाधीक्षक संतोष खाडे पीएसआय राजेंद्र वाघ,पोलीस अंमलदार शंकर चौधरी,दिगंबर कारखीले,अजय साठे,दिनेश मोरे,अरविंद भिंगारदिवे,उमेश खेडकर,सुनिल पवार,सुनील दिघे,अमोल कांबळे, मल्लिकार्जुन बनकर,जाधव,दहिफळे यांनी केली आहे.
No comments