सदगुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी मुक्ताईनग...
सदगुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात साजरी
मुक्ताईनगर प्रतिनिधी सतीश गायकवाड
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सदगुरु एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण शास्त्र महाविद्यालय, जळगाव येथे दिनांक 10 जुलै 2025 रोजी गुरुपौर्णिमा मोठया उत्साहात साजराकरण्यात आला
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. अनिता वानखेडे होत्या, कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक दिपाली पाटील यांनी करताना व्यासपौर्णिमा, गुरुचे अनन्य साधारण महत्व सांगितले सूत्रसंचालन द्वितीय वर्ष अक्षय जाधव यांनी केले यानंतर प्रमुख पाहुणे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. विद्यार्थी शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले शिल्पा वडनेरकर, प्रियंका पाटील, दिपाली पाटील, भावना महाजन, माधुरी ठाकरे,यांनी गुरु प्रति आत्मसन्मानी गुरुचे महत्व याविषयी माहिती सांगितले. डॉ प्रतिभा पाटील यांनी मार्गदर्शन करताना गुरुमुळे ज्ञान व अनुभव संपन्न झाले प्रत्येक व्यक्ती यगुरु समान आहे तसेच शिक्षक विद्यार्थी संबंध जिव्हाळ्याचे असतात. त्यांनी गुरूंचे आभार व्यक्त केले. डॉ. जयश्री पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुशिक्षित आदर्श नागरिक बनण्याचा प्रोत्साहन दिले.तसेच अध्यक्षिय भाषणात डॉ अनिता वानखेडे यांनी काळा बरोबर गुरु शिष्य नातं हे बदलत आहे याचे उदाहरण सांगितले फाल्गुनी निकम यांनी आभार प्रदर्शन केले.आणि अध्यक्षांच्या अनुमती कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ नारायण खडके, डॉ अनिता वानखेडे, डॉ प्रतिभा पाटील, डॉ जयश्री पाटील, प्रा. सुवर्णा अहिरे, प्रा, निधी शर्मा, पंकज वाघ, अरविंद पवार, बी.एड द्वितीय वर्षाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षिका यांचे सहकार्य लाभले
No comments