adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रामपुरा वॉर्ड क्रं.३ येथे पाणीपुरवठा नियमित सुरु करण्याची मागणी जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य संघटने कडून मुख्य अधिकारी यांना निवेदन

रामपुरा वॉर्ड क्रं.३ येथे पाणीपुरवठा नियमित सुरु करण्याची मागणी  जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य संघटने कडून मुख्य अधिकारी यांना निवेदन  चोपडा ...

रामपुरा वॉर्ड क्रं.३ येथे पाणीपुरवठा नियमित सुरु करण्याची मागणी 

जय रावण प्रतिष्ठान महा.राज्य संघटने कडून मुख्य अधिकारी यांना निवेदन 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा : शहरातील रामपुरा वॉर्ड क्रं.३ मध्ये  मागील १४ दिवसांपासुन पाणीपुरवठा पुर्णतः बंद असल्याने  स्थानिक रहिवाशांना पिण्याचे पाणी, स्वयंपाक आणि इतर दैनंदिन गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत असून वॉर्ड क्रं. ३ रामपुरा मध्ये गेल्या १४ दिवसा पासुन पाणीपुरवठा का होत नाही, पाईपलाईन दुरुस्ती, कमी दाब किंवा इतर तांत्रिक समस्यां मुळे ही परिस्थीत उद्भवली आहे कि काय अशी चर्चा असून येथिल स्थानिक रहिवाशांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे,


जे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. तरी यापुर्वीही पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे तोंडी तक्रार केली होती, परंतु अद्याप पर्यंत कोणताही ठोस उपाय झालेला नाही. असे हि दिलेल्या निवेदनात म्हटले आहे तरी निवेदन पुढे म्हटले आहे की आपणांस विनंती आहे की, आमच्या खालील मागण्या तातडीने पुर्ण कराव्यात-

१. वॉर्डात नियमीत आणि पुरेसा पाणीपुरवठा सुरु करण्यात यावा.

२. पाणीपुरवठा अनियमीत असल्यास त्याची कारणे स्पष्ट करावीत आणि तांत्रिक दुरुस्ती त्वरीत करावी.

३ . भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना करावी.

४. आमच्या वॉर्ड क्रं.३ पारधीवाडा मध्ये घंटागाडी येत नाही, गटारी काढत नाहीत तरी हे नियमीत व्हा ही नम्र विनंती.

आम्ही आशा करतो की आपण आमच्या समस्येकडे लक्ष देऊन कार्यवाही कराल, जेणेकरुन रहिवाशांना दिलासा मिळेल.

चोपडा नगरपरिषदेला जय रावण प्रतिष्ठान महा,राज्य संघटनेच्या वतीने निवेदन दि. २१ जुलै २०२५ जय रावण प्रतिष्ठान महाराष्ट्र,राज्य संघटनेतर्फे चोपडा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी श्री.संजय मिसर साहेब यांना वॉर्ड क्रमांक ३, रामपुरा भागातील नियमित पाणीपुरवठा आणि इतर समस्यांबाबत निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संघटनेचे महासचिव अजय पारधी, युवा अध्यक्ष अक्षय पारधी, सामाजिक कार्यकर्ते मयुर चव्हाण, रतीलाल साळुंखे, किरण पारधी, महेश पारधी, अतुल पारधी, विजय पारधी यांच्यासह स्थानिक रहिवासी उपस्थित होते.

No comments