adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीस तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त

 घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीस तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त  सचिन मोकळं अहिल्यानगर  (संपादक -:- ...

 घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीस तोफखाना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त 



सचिन मोकळं अहिल्यानगर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर (दि.३०):-घरफोडी करणाऱ्या सराईत टोळीस जेरबंद करण्यात   तोफखाना पोलिसांना मोठे यश आले असून आरोपींकडून  5,45,000/-रु किं.चा 100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.बातमीची हाकिकत आशिकी,फिर्यादी नामे गणेश सुधाकर मंचरकर (वय-42 वर्षे, धंदा-सरकारी नोकरी,रा-प्लॉट नं. 202, शिवसुदा रेसीडेन्सी,दसरे नगर,सावेडी, ता.जि-अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, दि.15/01/2025 रोजी दुपारी 03/00 वा ते सांयकाळी 05/15 वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचा दरवाजाचे कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी यांचे 53,000/- रु कि.चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली वगैरे मजकुरच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि नं.37/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 305 (अ), 331 (3), 317 (5) प्रमाणे दि.15/01/2025 रोजी गुन्हा दाखल करणेत आलेला होता. 

नमुद गुन्ह्याचे तपास करत असताना पोलिसांना सदरचा गुन्हा हा 1)कैलास चिंतामण मोरे,रा.सोनगीर,जि.धुळे, 2) जयप्रकाश राजाराम यादव, रा.दिनदासपुर,जि.वाराणसी, उत्तर प्रदेश, 3)रविंद्र आनंद माळी,रा-सोनगीर,जि.धुळे, 4) सुशिल ऊर्फ सुनिल ईश्वर सोनार,रा.बालाजीनगर, शिंगावे, जि.धुळे यांनी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरापींना वरील नमुद गुन्ह्यात अटक करुन पोलीस कोठडी दरम्यान आरोपींनी तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तीन ठिकाणी घरफोडी केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपींकडुन गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती नगर शहर विभाग यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस निरीक्षक श्री.आनंद कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पो.हे.कॉ.बाळासाहेब गिरी, गोरख काळे, दिपक गांगर्डे, भानुदास खेडकर, सुधिर खाडे, सुरज वाबळे, पो.ना.रमेश शिंदे, पो.कॉ.सुमित गवळी, सतिष त्रिभुवन, भागवत बांगर यांनी केली आहे.

No comments