रावेर पोलिसांची झन्ना मन्ना पत्ता क्लबवर धाड ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल दुचाकीसह ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (...
रावेर पोलिसांची झन्ना मन्ना पत्ता क्लबवर धाड ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल दुचाकीसह ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रसलपूर रोडवरील हॉटेल एस२ च्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाखाली चालणाऱ्या झन्ना मन्ना पत्ते जुगार क्लबवर रावेर पोलीस स्टेशनचे पथकाने छापा टाकला आणि या छाप्यात सुमारे ८६ हजार रुपयांच्या जुगार क्लबच्या वस्तू जप्त केल्या आहेत. या कारवाईत सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर रावेर पोलिसांनी 'झन्ना मन्ना' नावाच्या जुगार अड्ड्यावर तात्काळ छापा टाकला. छापेमारी दरम्यान ११,००० रुपये रोख, सुमारे ७५,००० रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली आणि पत्त्यांचा एक गठ्ठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस कर्मचारी गणेश भदाणे यांनी रावेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा (१२अ) अंतर्गत जीआर क्रमांक ३२७/२०२५ अंतर्गत जुगारात सहभागी असलेल्या ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप आणि रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पुढील तपास पो कॉ योगेश पाटील करीत आहे
No comments