adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल तालुक्यात पुन्हा बिबट्याचा दरारा ? पाडळसे-पिळोदा परिसरात ग्रामस्थांमध्ये व शेतकरी वर्गांमध्ये घबराट

  यावल तालुक्यात पुन्हा बिबट्याचा दरारा ?  पाडळसे-पिळोदा परिसरात ग्रामस्थांमध्ये व शेतकरी वर्गांमध्ये घबराट  फाईल चित्र  भरत कोळी यावल ता. प...

 यावल तालुक्यात पुन्हा बिबट्याचा दरारा ? 

पाडळसे-पिळोदा परिसरात ग्रामस्थांमध्ये व शेतकरी वर्गांमध्ये घबराट 

फाईल चित्र 

भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 यावल तालुक्यातील पाडळसे आणि पिळोदा शिवारात पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अचानक बिबट्या दिसल्याने शेतात काम करणाऱ्या मजुरांनी आणि शेतकऱ्यांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, काही शेतकरी पाडळसे आणि पिळोदा गावांच्या हद्दीजवळ असलेल्या शेतात काम करत असताना त्यांना बिबट्या फिरताना दिसला. बिबट्याला पाहताच शेतात एकच घबराट उडाली. वाघाने काही वेळ परिसरात वावर केल्यानंतर तो दाट झाडीत अदृश्य झाला. याशिवाय, त्याच ठिकाणी बिबट्याने एका गाईला ठार मारल्याचेही आढळून आले आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत. विशेषतः शेतीच्या कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने याकडे लक्ष देऊन बिबट्याचा शोध घ्यावा आणि त्याला सुरक्षितपणे पकडून योग्य अधिवासात सोडावे अशी मागणी केली आहे. पाडळसे येथील पोलीस पाटील सुरेश खैरनार यांनी घटनेची माहिती वनविभागाला दिली असून, वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. बिबट्याच्या हल्ल्यासारख्या घटना टाळण्यासाठी वनविभागाने योग्य उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील काही दिवस नागरिकांनी दक्षता घ्यावी आणि अनावश्यक रात्रीचा प्रवास टाळावा असे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments