24 जुलै शेतकरी चक्काजाम नव्हे तर आत्महत्या थांब दिवस अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर:- महाराष्ट्र राज्यात दिवस...
24 जुलै शेतकरी चक्काजाम नव्हे तर आत्महत्या थांब दिवस
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर:- महाराष्ट्र राज्यात दिवसागणिक वाढणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताजनक बाब ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आणि सातबारा कोरा करण्याची आश्वासन निवडणुकीपूर्वी दिले होते. या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने व महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटना व सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केलेले आहेत. बच्चुभाऊ यांचे छत्रपतींच्या रायगड येथे अन्न त्याग आंदोलन आमदारांच्या घरासमोर मशाल आंदोलन, मोझरी येथे उपोषण, 138 किलोमीटरची पायदळ यात्रा या यात्रेमध्ये मतदान कोणालाही करा परंतु शेतकऱ्यांच्या लक्ष्मीचे कुंकू ( सिंदूर ) आत्महत्येच्या कलंकांनी पुसले जात असताना शेतकरी आंदोलनाकडे सत्ताधारी मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहेत.
शेतकऱ्यांची मुलं म्हणून सत्तेमध्ये गेलेली सत्ताधारी आमदार कर्जमाफीचा क देखील उच्चारायला तयार नाही थकीत कर्ज वसुलीसाठी सहकार व राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना वेठीस धरलेले आहे शेतकऱ्यांना कर्ज भरावी तरी अडचण नाही भरावी तरी अडचण कर्जमाफीच्या संदर्भात राज्य सरकार योग्य वेळेची वाट पाहत आहे यामुळे थकीत कर्जदार आणि त्यांच्या डोक्यावर वाढणारा व्याजाचा बोजा याबाबतीत कोणीही बोलायला तयार नाही सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे वाक्य जवळजवळ सत्ताधाऱ्यांनी संपुष्टात आणल्यात जमा आहे शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न आवासून उभा असताना शेतकऱ्याकडे नगदी पीक म्हणून उपलब्ध असलेले कांदा माती मोल भावामध्ये शेतकऱ्यांना विकावा लागत आहे बांगलादेशाची आयात निर्यात धोरण आजही दळमळीत अवस्थेमध्ये आहे या सर्व बाबींचा जाब विचारण्यासाठी बटेंगे तो कटेगे ही घोषणा देऊन सत्तेत आलेली सत्ताधारी यांना सातबारा कोरा करण्यासाठी व नगदी पीक कांदा यांचा योग्य भाव मिळण्यासाठी मी भाजपचा मी काँग्रेसचा मी राष्ट्रवादीचा, मी शिवसेनेचा मी शेतकरी संघटनेचा मी अमुक संघटनेचा मी तमुक संघटनेचा हे सर्व विसरून मी शेतकरी बापाच्या पोटचा आणि शेतकऱ्याच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणारा शेतकरी म्हणून एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांना शेतकरी आत्महत्या ची दहा तास समजून देण्यासाठी 24 तारखेला मत कोणालाही द्या निवडणुकीच्या काळात प्रचार कोणाचाही करा परंतु सातबारा कोरा करण्यासाठी 24 जुलै रोजी चक्काजाम नव्हे तर आत्महत्या थांब दिवस येण्यासाठी एकत्र येऊयात आरोप प्रत्यारोप नेतृत्व हे सर्व बाजूला सारून शेतकरी एकजुटीचा जागर करण्यासाठी आणि शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि म्हणूनच जात पंथ धर्म भेद विसरूनी मी शेतकरी शेतकरी एकजुटीचा जागर करूया या चक्काजाम आंदोलनामध्ये सर्वांनी सामील व्हावे हीच विनंती संपर्क अजय टप जिल्हा उपप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष
No comments