Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पोलीसांनी 4लाखांच्या वाहनासह 2लाख 34हजारांचा गुटखा केला जप्त चौघांवर गुन्हा दाखल एक अटकेत

  रावेर पोलीसांनी 4लाखांच्या वाहनासह 2लाख 34हजारांचा गुटखा केला जप्त  चौघांवर गुन्हा दाखल एक अटकेत  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:-...

 रावेर पोलीसांनी 4लाखांच्या वाहनासह 2लाख 34हजारांचा गुटखा केला जप्त 

चौघांवर गुन्हा दाखल एक अटकेत 

रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांना मिळालेल्या गोपनीय माहिती नुसार मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर येथून (एमएच ०४ एचएन १७०९) क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या गाडीतून गुटख्याचा मोठा साठा रावेर शहरातून फैजपूर कडे जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रावेर पोलीसांचे पथक रवाना केले पोलीस पथकाने रावेर बुर्हानपुर रस्त्यावरील स्वस्तिक टॉकीज जवळच्या पेट्रोल पंप समोर मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर येथून (एमएच ०४ एचएन १७०९) क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या गाडीला थांबवून तपासणी केली असता गाडीत गुटख्याचा मोठा साठा आढळून आला  सदर गाडी रावेर पोलीसांनी ताब्यात घेऊन गाडीची तपासणी केली असता  गाडीमध्ये  एकूण २ लाख ३४ हजार ८० रू. कि किमतीचा गुटखा आढळून आला.यामध्ये १लाख १६ हजार ६८८ रुपये किमतीचे १८७प्रति पाकीटप्रमाणे ३ मोठ्या गोण्या,

२० हजार ५९२ किमतीचे ३३ प्रति पाकीटप्रमाणे ३ गोण्या, १९८ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या८७ हजार १२० रूपे. किमतीचे २२ प्रति पाकीटप्रमाणे २ गोण्या ९ हजार ६८० रुपये किमतीचे २२ पाकीट २ गोण्या, गुटख्यासोबतच गुटखा वाहतूकीने तस्करी करणारी चार लाख रुपये किमतीचे चारचाकी वाहन ही रावेर पोलीसांनी ताब्यात घेऊन एकूण ६ लाख ३४ हजहार रूपये किंमतीचा मुद्देमाल  जप्त केला आहे.


या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सुकेश शब्बीर तडवी यांच्या फिर्यादीवरून रावेर पोलिस ठाण्यात शेख मुजाहिद शेख रफिक रा. फैजपूर (अटक), आसिफ अहमद जमील अहमद र. फैजपूर, कल्लू उर्फ मोहसिन शेख युनुस शेख फैजपूर, आणि एक अनोळखी इसम अशा चार आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एक आरोपीस अटक करण्यात आली असून तीन आरोपी फरार झाले आहे त्याचा पोलीस कसून शोध घेत आहेत याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पुढील तपास करीत आहेत 

सदरील कारवाई रावेर पोलीस स्टेशन व फैजपूर उपविभागीय पोलीस कार्यालयाचे कर्मचारी संयुक्त पथकाने केली. ही कारवाई रावेर पोलीस स्टेशनच्या महीला सहायक पोलीस निरीक्षक मिरा देशमुख, पोलीस उपनिरीक्षक अविनाश चौधरी, पो.कॉ. सुकेश तडवी, संभाजी बिजागरे, विकारुद्दीन शेख, महेंद्र महाजन व गणेश मनुरे यांनी केली

No comments