Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मनवेल आश्रमशाळेत गुरूपौर्णिमा साजरी

  मनवेल आश्रमशाळेत गुरूपौर्णिमा साजरी भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मनवेल , ता. यावल  :   येथील प्राथमिक व माध्यमिक अनु...

 मनवेल आश्रमशाळेत गुरूपौर्णिमा साजरी


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मनवेल , ता. यावल  :   येथील प्राथमिक व माध्यमिक अनुदानित आश्रमशाळेत गुरूपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे ज्येष्ठ सभासद देविदास पाटील होते . कार्यक्रमाच्या सुरूवातीला माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील यांच्या हस्ते महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .

            गुरूपौर्णिमेनिमित्त शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थेचे सभासद देविदास पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . शिक्षक राकेश महाजन यांनी गुरूपौर्णिमेविषयी माहिती देऊन गुरूंचे महत्त्व सांगितले . शाळेतील विद्यार्थ्यांनी देखील पुष्पगुच्छ देऊन शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली . कार्यक्रमाचे छायाचित्रण संदीप पाटील यांनी केले .

                  कार्यक्रमाला माध्यमिक मुख्याध्यापक सचिन पाटील , पालक मन्साराम बारेला , अधिक्षिका सरिता तडवी , ज्येष्ठ शिक्षिका उज्वला पाटील ,  शिक्षक सुभाष पाटील , नितीन चौधरी , कमलाकर इंगळे , विजय चव्हाण , इंद्रजित पाटील  उपस्थित होते .

No comments