घरफोडीतील 8 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश.. सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायक...
घरफोडीतील 8 लाख 76 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश..
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि२३):-घरफोडीच्या गुन्ह्यातील 8 लाख 76 हजार रू.किमतीचे 92 ग्रॅम वजनाचे दागिने हस्तगत करण्यात तोफखाना पोलिसांना यश आले आहे.याबाबत हकीकत अशी की,फिर्यादी सुनंदा नरहरी ढाकणे (रा.पोलीस मुख्यालय अहिल्यानगर) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की,दि.17 जुलै रोजी राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजाची कडी कुणीतरी अज्ञात चोरट्याने उघडून घरामध्ये प्रवेश करून लोखंडी कपाटामध्ये ठेवलेले 68 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर यांनी तपास चक्रे फिरवत सोन्याचे दागिने हे प्रकाश उर्फ मारी रावसाहेब उमाप याने घेतल्याचे समजले त्यास पोलिसांनी अटक करून विचारपूस केली असता त्याने कबुली दिली की गुन्ह्यातील व बालिकाश्रम रोड येथील चोरीचे व सोन्याच्या चांदीचे दागिने हे त्याचा मित्र दुर्गेश चंद्रकांत चिंतामणी याच्याकडे दिल्याचे सांगितल्याने दुर्गेश यास अटक करून त्याच्याकडून सोन्याचे व दागिने हस्तगत करण्यात आले. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अमोल भारती, तोफखाना पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहेर, पोलीस अंमलदार योगेश चव्हाण,अविनाश बर्डे,सतीश त्रिभुवन,सतीश भवर,भागवत बांगर,मोबाईल सेलचे पोलीस अंमलदार राहुल गुंडू यांनी केली आहे.
No comments