पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण गरजेचे- प्र. प्राचार्या संध्या सोनवणे भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल (दि१२)- जळग...
पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण गरजेचे- प्र. प्राचार्या संध्या सोनवणे
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल (दि१२)- जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वृक्षारोपण उपक्रम सामाजिक वनीकरण विभाग यावल व महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. यात प्रादेशिक वन अधिकारी श्री सुनील पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे व वन विभागातील सहकारी अधिकारी यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांनी मार्गदर्शनात प्रत्येक सजीवांसाठी हवा व ऑक्सिजन उपयुक्त असते. यात वृक्षावरील प्रत्येक पान हे प्रकाश संश्लेषण प्रक्रिये द्वारे वातावरणात ऑक्सिजन सोडतात व स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात या प्रक्रियेमुळे वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. वातावरणातील ऑक्सिजन प्रत्येक सजीव घेऊन आपले जीवन सुरळीत चालवत आहेत. याद्वारे पर्यावरण संतुलन होते म्हणून पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी प्रादेशिक वन अधिकारी श्री सुनील पाटील यांनी वन महोत्सव कार्यक्रम बाबत माहिती दिली. हा कार्यक्रम दिनांक 15 जून ते 30 सप्टेंबर 2025 या दरम्यान राबविण्यात येणार आहे. "अमृत वृक्ष- आपल्या घरी" ही योजना शासकीय, निम शासकीय, शाळा, महाविद्यालय यांच्याकरिता मागणीनुसार व उपलब्धतेनुसार मोफत रोपे पुरवठा करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली. तसेच वेगवेगळ्या झाडांची ओळख करून दिली. त्यांचे वन औषधी उपयोग सांगितले.
सदर कार्यक्रमासाठी डॉ. एच. जी. भंगाळे, डॉ. आर. डी. पवार, प्रा. संजीव कदम, सामाजिक वनीकरण विभाग यावल येथील वनपाल- श्री आर. एम. तडवी, वनरक्षक श्री. चंद्रकांत सूर्यवंशी वनरक्षक श्री. ज्ञानोबा धुळगुंडे वन कर्मचारी श्री. दत्तात्रय तळेले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन उपप्राचार्य प्रा. एम. डी. खैरनार यांनी केले तर आभार प्रा. मनोज पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. नरेंद्र पाटील प्रा. छात्रसिंग वसावे, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. इमरान इरीस प्रा. सोनाली पाटील, प्रा. प्रतिभा रावते, प्रा.रूपाली शिरसाट, प्रा. हेमंत पाटील, श्री मिलिंद बोरघडे शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments