फैजपूर आठवडे बाजारातील महिलांच्या मुतारीची दुरावस्था तातडीने बांधकाम करण्याची मागणी! अन्यथा उपोषणाला बसणार? भीम आर्मीचे मौसीम तडवी पत्रकार...
फैजपूर आठवडे बाजारातील महिलांच्या मुतारीची दुरावस्था तातडीने बांधकाम करण्याची मागणी! अन्यथा उपोषणाला बसणार?
भीम आर्मीचे मौसीम तडवी पत्रकार कैफ खान यांचा निवेदनाद्वारे इशारा
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपुर येथील आठवडे बाजारातील बाजारपेठेत असलेल्या महिलांच्या मुतारीची अतिशय दुरवस्था झालेली आहे आठवडे बाजारात गेल्या काही महिन्या पासुन महिलांच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे मुतारीची मोठया प्रमाणावर दुरवस्था झाली आहे, आठवड्यात
दर बुधवारी या ठिकाणी बाजार भरतो महिला बाजार करणयासाठी मोठया संख्येने येत असतात मात्र लघुशंका साठी महिलाना मुतारी नाही मुतारी पुर्णपणे तुटलेली आहे,बांधकाम पडलेला आहे या गंभीर बाबकडे कोणीही लक्ष देत नाही फैजपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व संबंधितांनी या गंभीर बाबी कडे लक्ष देऊन सदरील मुतारी चे बांधकाम तातडीने करावे जेणे करुन महिलांची गैरसोय होणार नाही १० दिवसात सदरील मुतारीचे बांधकाम न
झाल्यास नगरपरिषद समोर उपोषणाला बसणार असल्याचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून इशारा फैजपुर येथील पत्रकार कैफ खान भीम आर्मी शहर अध्यक्ष मौसीम तडवी,शेख रईस, मुझाहिद यांनी दिला आहे
No comments