adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा वंचितचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांची निवेदनाद्वारे मागणी

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा वंचितचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांची न...

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवा वंचितचे जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांची निवेदनाद्वारे मागणी


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आवारात संविधान निर्माते, भारताचे प्रथम कायदेमंत्री, कायदेतज्ञ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हा महासचिव अतिशभाई खराटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे 


    महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मलकापूर उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, मलकापूर येथे काही वर्षांपूर्वी नवीन न्यायालयिन इमारतीचे बांधकाम झालेले असून सदर ठिकाणी कायदेतज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभा राहिल्यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय मलकापूर येथील कायद्याचे कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल व यामुळे न्यायालयीन सौंदर्यात निश्चितच भर पडेल तथा विदर्भाचे पश्चिम प्रवेशद्वार असलेले मलकापूर शहरासह जिल्ह्यासाठी भूषणावह बाब ठरेल, मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली सह भारतातील अनेक राज्यात न्यायालयीन परिसरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य असे पुतळे बसविण्यात आलेले असून त्या धर्तीवर मलकापूर जिल्हा बुलढाणा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसविण्यात यावा करीता निवेदन देण्यात आले आहे 

    अतिशभाई खराटे यांनी दिलेल्या निवेदनाच्या प्रतिलिपी मा .भूषण गवई साहेब, सरन्यायाधीश मा. सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली, मा.अँड. प्रकाश आंबेडकर, कायदेतज्ञ तथा राष्ट्रीय अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मा.अध्यक्ष बार असोसिएशन मलकापूर, जि.बुलढाणा यांना पाठविण्यात आल्या आहेत

No comments