रस्त्यावर वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करणे बेकायदेशीर वाहतूक कोंडी केल्यास कारवाई - सपोनि विशाल पाटील रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी...
रस्त्यावर वाहने उभी करून वाहतूक कोंडी निर्माण करणे बेकायदेशीर वाहतूक कोंडी केल्यास कारवाई - सपोनि विशाल पाटील
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा फैजपूर महामार्गावरील टांन्सपोर्ट समोर ट्रक उभे करून वाहतूक कोंडी निर्माण करणे बेकायदेशीर असल्याचे आज 2 जुलै बुधवार रोजी सावदा पोलीस स्टेशन येथे ट्रान्सपोर्ट संचालकांच्या आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी सांगितले या बैठकीत सहाय्यक पुढे बोलतांना ते म्हणाले की ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून ताकीद देऊन अनधिकृत व्यवसाय आणि सदरील परिसरात शाळा कॉलेज महाविद्यालय आहेत यासंबंधीतांना रहदारीस अडधळा व वाहतूक कोंडी करणार्या वर कारवाईचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तसेच ट्रान्सपोर्ट संचालकानी पार्किंगच्या नावाखाली 100 रुपये घेण्याची प्रथा बंद करावी. यासह सावदा-फैजपूर रोडवर केळीचा वेस्टेज पडलेला दिसतो, ज्यामुळे सार्वजनिक आरोग्याला धोका निर्माण होतो. ट्रान्सपोर्ट समोर कचरा आढळल्यास कलम 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा दाखल होईल. चालकांनी स्वतःहून खर्च करून रस्ते स्वच्छ ठेवावेत.”
या बैठकीने सावदा शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवसायातील अनागोंदी आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवर यावेळी त्यांनी प्रकाश टाकला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या कठोर सूचनांमुळे ट्रान्सपोर्ट चालकांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे सावदा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास आणि नागरिकांच्या सुरक्षिततेस मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


No comments