adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची तक्रार निवारण सभा सकारात्मक वातावरणात संपन्न

  जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची तक्रार निवारण सभा सकारात्मक वातावरणात संपन्न इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  दिनांक 2 जुलै 20...

 जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची तक्रार निवारण सभा सकारात्मक वातावरणात संपन्न


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 दिनांक 2 जुलै 2025 रोजी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक शिक्षक संघटना यांची संयुक्त बैठक शिक्षणाधिकारी यांच्या दालनात सुमारे तीन तास मीटिंगच्या अजेंडावर असणाऱ्या प्रत्येक विषयावरती सखोल चर्चा होऊन शिक्षकाच्या सर्व समस्यांचे वेळेच्या आत निराकरण केले जाईल, अशी भूमिका मा. शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना कल्पना चव्हाण यांनी मांडली. प्रलंबित मुख्याध्यापक व इतर पदोन्नती मान्यता,  अनुकंपाच्या मान्यता, नियमित वेतनश्रेणी मान्यता, वैयक्तिक मान्यता याविषयी दहा दिवसाच्या आत कार्यवाही करण्यात येईल... संच मान्यता दुरुस्तीसाठी विशेष शिबिर लावण्यात येईल.


मा.आमदार श्री.सत्यजित तांबे साहेब यांच्या सभेतील ठरल्याप्रमाणे प्रलंबित कामे पंधरा दिवसाच्या आत मंजूर करण्यात येतील.  सेवानिवृत्तीचे प्रस्ताव तात्काळ मार्गे लावण्यात येतील... ना हरकत प्रमाणपत्र तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील... दरमहा  होणारे वेतन वेळेवर करण्यात येतील. असे निर्णय घेण्यात आले. सभेची प्रस्तावना व विषय मांडणी एस्.डी.भिरुड यांनी केली. सभेसाठी जे.के. पाटील, एस्. डी. भिरुड,जयवंतराव पाटील,यु. यु दादा पाटील,गोपाळ पाटील,एच्. जी. इंगळे, आर. एच्. बाविस्कर, संभाजी अप्पा पाटील, नंदन वळीकर, शैलेश राणे, सुनील गरुड, संदीप डोलारे, राजेंद्र धनगर, प्रदीप वाणी, सुनील तायडे, एन ओ चौधरी, अरुण सपकाळे, एस के पाटील, अजित पाटील, आबा पाटील, दिगंबर पाटील, डी ए पाटील, संभाजी अस्वार, ललित चौधरी.संघटनेच्या वतीने उपस्थित होते तर कार्यालयातील अधीक्षक  रियाज  तडवी, उपशिक्षणाधिकारी  रागिणी चव्हाण, फिरोज पठाण, एजाज शेख, प्रशासन अधिकारी  प्रतिभा सुर्वे व कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. शैलेश राणे यांनी आभार मानले.

No comments