चोपड्यात काळवीट या वन्य प्राण्यांचे मांस व शिंगांची वाहतूक करणारे दोघंजण ताब्यात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि वनविभाग यांच्या संयुक्त कार...
चोपड्यात काळवीट या वन्य प्राण्यांचे मांस व शिंगांची वाहतूक करणारे दोघंजण ताब्यात
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि वनविभाग यांच्या संयुक्त कारवाई
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपड्यात काळवीट या वन्य प्राण्यांची शिकार सिने अभिनेता सलमान खान याला जशी महागात पडली तसाच प्रकार चोपडा तालुक्यातील दोन आदिवासींना चांगलाच महागात पडणार आहे.काळविटाचे मांस व शिंगे घेऊन दोन जण जात असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचत दोघांची झाडाझडती घेतली असता मास व काळवीटचे शिंगे त्यांच्याकडे आढळून आले असून वन व पोलीस विभागाने संयुक्तीक कारवाई केली दोघांना ताब्यात घेतले आहे.
मांस व शिंगांची वाहतूक करणाऱ्या दोघांनची नावे बांगऱ्या फुसल्या बारेला व धुरसिंग वलका बारेला अशी असून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने त्यांना जेरबंद केले आहे.त्या दोघांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे.वाहतूक पोलीस कर्मचारी राकेश पाटील आणि गजानन पाटील असे दोघे वाहतूक करत असतांना त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईला मूर्त स्वरुप देण्यात आले.चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन आणि वनविभाग यांच्या संयुक्त कारवाईत दोघं शिका-यांना अडवून त्यांची व त्यांच्या ताब्यातील मोटर सायकलची तपासणी करण्यात आली.या तपासणीत त्यांच्याकडे शिकार केलेला काळविटाचे मांस आणि शिंगे आढळून आली.
बोरअजंटी ते वैजापुर दरम्यान रस्त्यावर पोलीस निरीक्षक अनिल भवारी,सहाय्यक फौजदार राजु महाजन,पोहेकॉ राकेश पाटील,पोकॉ गजानन पाटील,विनोद पवार,चेतन महाजन,सुनिल कोळी वनविभागाचे आरएफओ विकेश ठाकरे,वनपाल सारिका कदम,वनरक्षक वी.आर.बारेला,वनरक्षक वानु बारेला,वनरक्षक योगेश सोनवणे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.वन विभागामार्फत पुढील कारवाई करण्यात येत आहे
No comments