माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांची प्रांतअधिकारी कार्यालयात गैर वर्तवणूक!! महसूल कर्मचाऱ्यांचे काळेफिती लावून कामकाज! कारवाई न झाल्यास छेडण...
माजी नगराध्यक्ष निलेश राणे यांची प्रांतअधिकारी कार्यालयात गैर वर्तवणूक!! महसूल कर्मचाऱ्यांचे काळेफिती लावून कामकाज! कारवाई न झाल्यास छेडणार तीव्र आंदोलन
फैजपूर प्रतिनिधी इदू पिंजारी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
उपविभागीय अधिकारी फैजपूर भाग फैजपूर यांच्या कार्यालयात फैजपूर येथील माजी नगराध्यक्ष निलेश उर्फ ( पिंटू राणे ) यांनी गैरवर्तवणूक केल्यामुळे रावेर यावल तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटनांनी काळ्याफिती लावून कामकाज सुरू केले तसेच गैरवर्तवणूक केली म्हणून कारवाई न झाल्यास महसूल कर्मचारी संघटना तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे आज गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी दिलेल्या निवेदनात महसूल कर्मचारी संघटनांनी नमूद केले आहे की रावेर/यावल तहसीलदार नायब तहसीलदार रावेर/यावल महसूल कर्मचारी संघटना ग्राम महसूल अधिकारी संघटना महसूल सेवक संघटना चतुर्थी श्रेणी कर्मचारी संघटना यावल/रावेर यांचे कडून निवेदन देण्यात येते की काल दिनांक 16/7/2025 रोजी कार्यालयिन वेळेत पूर्ण परवानगी न घेता निलेश राणे नामक व्यक्ती यांनी उपविभागीय अधिकारी तथा बबनराव काकडे यांचे दालनात बेकायदा प्रवेश करून कुठल्याही प्रकारची विचारपूस न करता त्यांच्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रीकरण करत असताना आर्वाच्च भाषेचा वापर करून कोणताही व्यक्ती तुमच्याकडे काम घेऊन आला तर तुम्ही फक्त कागद व लॅपटॉप हलवता अशा भाषेचा वापर केला बऱ्याच ऑनलाईन मीटिंग व व्हीसी असल्यामुळे दालनाचा दरवाजा बंद असतो त्यांनी असे म्हटले की यापुढे जर दालनाचा दरवाजा बंद दिसला तर लाथेने दरवाजा तोडीन अशी धमकी देऊन एकेरी व आरेरावेची भाषा वापरली अशा मुळे शासकीय काम करत असताना सरकारी कर्मचारी अधिकारी यांच्यात सदर व्यक्तीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी दडपणाखाली काम करत आहे व त्याचा विपरीत परिणाम शासकीय कामाच्या गुणवत्तेवर दिसून येते. वरील विषयाच्या निषेधार्थ आम्ही वरील अधिकारी व कर्मचारी संघटना आज गुरुवार दिनांक 17 जुलै 2025 रोजी काळ्याफिती लावून कामकाज करत असून सदर व्यक्तीवर कारवाई न झाल्यास किंवा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावल/रावेर तालुक्यातील महसूल संघटना सर्व कर्मचाऱ्यांनी दिला आहे.
-------------------------------------------------------
प्रतिक्रिया
फैजपूरचे माजी उपनगराध्यक्ष शे.कुर्बान यांनी या प्रकरणाचा निषेध केला. निलेश राणे याचा राजकीय बॉस कोण व त्याच्या भरोसे हा दहशत माजवतो आहे त्या राजकिय बॉस ने त्याला घरचा रस्ता दाखुवन बहिष्कृत करावे प्रामाणिक अधिकारी वर्गाला त्रास देणारे निलेश राणे हा सर्व शासकीय कार्यालयात दहशत माजवत आहे यासाठी राजकीय बॉस ने त्याला घरचा रस्ता दाखविला पाहिजे व चुकीच्या गोष्टी करत असेल तर गुन्हा दाखल करण्याचे सूचना प्रशासनास दिल्या पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान यांनी दिली.
No comments