लाखो रुपयांची सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त मार्केटयार्ड जवळ कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- हेमकांत गायकवाड...
लाखो रुपयांची सुगंधी तंबाखू व गुटखा जप्त मार्केटयार्ड जवळ कोतवाली पोलिसांची मोठी कारवाई
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१४):-सुगंधीत तंबाखु व गुटखा यांची वाहतुक करणाऱ्या वाहनावर कोतवाली पोलीसांनी कारवाई करत 11,07,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून दोन इसमानवर गुन्हा दाखल केला आहे.दि.14 जुलै 2025 रोजी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की,शहरात कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत एक चारचाकी वाहन हे महाराष्ट्र राज्यात प्रतीबंधीत असलेला गुटखा व पानमसाला अवैधरित्या विक्री करणे करीता घेवुन येणार आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक श्री. प्रताप दराडे यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक/कृष्णकुमार सेदवाड हे पोलीस स्टाफ,दोन पंच व सुरक्षा अधिकारी श्री. राजेश नामदेवराव बडे यांचेसह सदर चारचाकी वाहनाचा शोध घेत असतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर,मार्केटयार्ड चौक येथे जाऊन थांबले असताना तेथून एक चारचाकी वाहन पोलिसांना येताना दिसले त्यास थांबविले असता सदर वाहन चालक हा वाहन घेवुन पळुन जात असताना आंबेडकर पुतळ्यासमोर,मार्केटयार्ड चौक येथे अहिल्यानगर वाहन पकडून छापा टाकला असता सदर चारचाकी वाहनात दोन इसम दिसुन आले.त्यावेळी सदर दोन्ही इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव जुबेर बाहीद जोहर शेख,वय-31 वर्षे, रा. प्लॅट नं.4.बिल्डींग A-3. ब्रम्ह इस्टेट, CHS, कोंढवा खुर्द, पुणे,शंकर विलास नेटके, वय 22 वर्षे,रा.वारुळाचा मारुती, नालेगाव,असे असल्याचे सांगितले.त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक/कृष्णकुमार सेदवाड यांनी पोलीस स्टाफ,दोन पंच व सुरक्षा अधिकारी श्री. राजेश नामदेवराव बडे अशांची ओळख सांगुन त्यांना झडतीचा उद्देश समजावुन सांगुन सदर चारचाकी वाहनाची व सदर दोन्ही इसमांची झडती घेतली असता त्यांचे ताब्यात एकुण 11,07,550/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने सदर मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांनी पंचासमक्ष जागीच जप्त केला.सदरचा जप्त मुद्देमाल व दोन्ही आरोपी यांना पुढील कारवाई करणेकरीता कोतवाली पोलीस स्टेशनला आणले असुन पोकॉ/2464 महेश सुभाष पवार यांच्या फिर्यादी वरुन त्यांचेविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 654/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 123, 223, 274, 275 सह अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 चे कलम 26, 27, 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक/कृष्णकुमार सेदवाड हे करित आहेत.सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.सोमनाथ घार्गे,अपर पोलीस अधिक्षक श्री.वैभव कलुबर्मे साहेब,उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग श्री. अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे,गुन्हे शोध पथकाचे पोसई/कृष्णकुमार सेदवाड,पोहेकॉ.बाळकृष्ण दौंड विशाल दळवी,सलीम शेख, विनोद बोरगे,सुर्यकांत डाके, विजय काळे,अभय कदम, सत्यजीत शिंदे,अमोल गाडे, अतुल काजळे,सोमनाथ केकाण, महेश पवार,शिरीष तरटे,सचिन लोळगे,दत्तात्रय कोतकर,प्रतिभा नागरे,दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ.राहुल गुंडु यांनी केली आहे.
No comments