शेगांव ,अकोला बससेवा सुरू करा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ताथोड तेल्हारा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तेल्हारा आगाराची तऴेगांव पा...
शेगांव ,अकोला बससेवा सुरू करा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप ताथोड
तेल्हारा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तेल्हारा आगाराची तऴेगांव पातुर्डा मार्गे शेगांव अकोला बससेवा सुरू करावी याकरिता आज आगार प्रमुख श्री मिथुन शर्मा यांना प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप गजानन ताथोड यांनी सदर निवेदन दिले
या मार्गा वर वाकोडी ,वाडी अदमपुर,उकऴी, उकऴी बाजार ,वागरगांव ,बाभुऴगांव तऴेगांव पातुर्डा ,तऴेगांव वडनेर इत्यादी गांवे येतात ,येथील विद्यार्थी नागरिक यांना,शेगांव अकोला येथे जावे लागते ,याकरिता बस चालु करणे महत्वपूर्ण आहे, विशेष या मार्गा वर प्रवासी संख्या मोठया प्रमाणावर असुन आगाराचे देखील उत्पन वाढु शकते, करिता बस सुरु करावी ही मागणी परिसरातील विद्यार्थी, नागरिक करित आहेत आणि तेल्हारा आगाराचे या मार्गावर बसेच येतात ,पण तऴेगांव पातुर्डा गावा पर्यंत येत असुन ती बस सुदधा तऴेगांव वडनेर या गावा पर्यंत नेण्यात यावी ही या गावा तील विद्यार्थी आणि नागरिक करीत आहेत
No comments