लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यावल अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर अवचार, उपाध्यक्ष गजानन बिऱ्हाडे. भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी ✒️ (संप...
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती यावल अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर अवचार, उपाध्यक्ष गजानन बिऱ्हाडे.
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी ✒️
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल शहरात समाज बांधवांच्या वतीने स्वातंत्र चळवळ आणि स्वतंत्र महाराष्ट्र चळवळीतील व्यक्तिमत्व आपल्या साहीत्याव्दारे परिवर्तनास मार्ग दाखविणारे समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती,
येत्या १ ऑगस्ट रोजी असून सदर जयंती मिरवणूक सालाबाद प्रमाणे या वर्षी दि ३ ऑगस्ट रोजी शहरात मोठ्या उत्सहात साजरी केली जाणाऱ आहे, लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती करीता उत्सव समितीची निवड करण्यात आली आहे. यात उत्सव समिती अध्यक्षपदी ज्ञानेश्वर अवचार यांची तर उपाध्यक्ष म्हणुन गजानन बिऱ्हाडे यांची निवड करण्यात आली आहे, तर खजिनदार पदी अशोक भालेराव यांची निवड करण्यात आली आहे, उत्सव समितीची बैठक समाज मंदिरात पार पडली.
शहरात ३ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने दरवर्षी प्रमाणे शहरातुन भव्य मिरवणुक काढली जाणार आहे. तेव्हा या करीता उत्सव समिती जाहीर करण्यात आली आहे. समाज मंदिरात पार पडलेल्या बैठकीत उत्सव समिती अध्यक्ष पदी ज्ञानेश्वर अवचार यांची निवड करण्यात आली असुन उपाध्यक्ष गजानन बिऱ्हाडे, सचिव. किशोर बिऱ्हाडे, खजिनदार अशोक भालेराव, कार्याध्यक्ष विलास मोरे यांची निवड करण्यात आली असुन या बैठकीत उत्सव समितीचे सदस्य धनराज मोरे, त्रिदेव मोरे, किरण बिऱ्हाडे, रितीक अवसरमोल, गोविंदा मोरे, युवराज मोरे, नेटके साहेब, रमेश मोरे, मधुकर बिऱ्हाडे, सुभाष साबळे, मधुकर रणसिंगे, सखाराम वैराळे, चंकू पारधे, नरेंद्र भालेराव, भारत मोरे, प्रेम मोरे, तुषार रणसिंगे, टिल्ल्या बिऱ्हाडे, अरुण बिऱ्हाडे, पिंटू चंदनशिव आदी सर्व समाज बांधव उपस्थित होते.
No comments