फैजपूरला जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्क्रूटिनी सेंटरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी मुदतवाढ ज...
फैजपूरला जे.टी.महाजन इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्क्रूटिनी सेंटरवर विद्यार्थ्यांची मोठी गर्दी मुदतवाढ जाहीर
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
बारावीच्या निकालानंतर सुरू झालेल्या अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेला जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालय, फैजपूर येथे विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महाविद्यालय हे अधिकृत स्क्रूटिनी सेंटर असल्यामुळे २८ जूनपासून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन नोंदणी आणि कागदपत्र पडताळणीचे सत्र सुरू आहे. या प्रक्रियेला आता १५ जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, १८ जुलै रोजी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर १९ ते २१ जुलै दरम्यान ग्रीव्हन्स सबमिट करता येणार आहेत. २४ जुलै रोजी अंतिम मेरिट लिस्ट जाहीर होणार असून त्यानंतर CAP राउंडसाठी तयारी सुरू होईल.
या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी करून आपली कागदपत्रे पडताळणी केली आहेत. यंदा अभियांत्रिकी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असून, मुलींसाठी ट्युशन फीमध्ये १०० टक्के सवलत मिळत असल्याने विद्यार्थिनींचा सहभागही उल्लेखनीय आहे. ही सवलत पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असल्यास लागू होते. यासोबतच डिप्लोमा नंतर थेट द्वितीय वर्ष प्रवेश प्रक्रियाही सुरू असून इच्छुकांनी वेळेत नोंदणी करून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. जी.ई. चौधरी, प्रा. एम.एम. बोरोले, प्रा. व्ही.व्ही. महाजन, प्रा. डी.आर. पाचपांडे, प्रा. जे.बी. भोळे, प्रा. एम.डी. पाटील, प्रा. मोहिनी चौधरी, प्रा. के.एस. सरोदे, प्रा. ओ.के. फिरके आणि प्रा. स्वप्नाली वाघुळदे हे विद्यार्थी व पालकांना सतत मार्गदर्शन करत आहेत.
No comments