बिडगाव येथे कै.ओ.गो. पाटील माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शनाचा प्रभावी सत्र एपीआय प्रमोद वाघ यांनी केले विद्यार्थिनींना मार्गदर्शन प्रतिनिध...
बिडगाव येथे कै.ओ.गो. पाटील माध्यमिक विद्यालयात मार्गदर्शनाचा प्रभावी सत्र एपीआय प्रमोद वाघ यांनी केले विद्यार्थिनींना मार्गदर्शन
प्रतिनिधी :- खलील आर तडवी बिडगाव
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
बिडगाव तालुका चोपडा १८ जुलै २०२५ रोजीकै.ओ. गो.पाटील माध्यमिक विद्यालय कुंड्या पाणी बिडगाव येथे बाल विकास स्नेही पंचायत बिडगाव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थिनींसाठी एक महत्वपूर्ण आणि जागरूकता निर्माण करणारे मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात श्री प्रमोद वाघ सर ए पीआय प्रभारी अधिकारी अडावद पोलीस स्टेशन यांनी उपस्थित विद्यार्थिनींना स्वतःच्या सुरक्षिततेविषयी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी मोबाईलचा योग्य वापर, सोशल मीडियावरील संभाव्य धोके, प्रवासात घ्यायची काळजी तसेच अनोळखी व्यक्तींशी संवाद साधताना आवश्यक असणारी दक्षता याबाबत उदाहरणासह स्पष्ट व सखोल माहिती दिली
कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक ए.ओ.पाटील बीड गावच्या सरपंच सौ. विजया पाटील अडावद पोलीस स्टेशनच्या महिला कॉन्स्टेबल मुख्याध्यापक श्री. पी एन पाटील गावातील मान्यवर नागरिक. पत्रकार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मार्गदर्शन सत्रामुळे विद्यार्थिनींमध्ये स्वतःच्या सुरक्षेबाबत जागरूकता आणि आत्मविश्वास वाढीस लागला असून सर्व उपस्थितांनी ए पी आय वाघ सरांच्या मार्गदर्शनाचे मनःपूर्वक कौतुक केले
No comments