मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा. जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगाव महानगरात महारक्तदा...
मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवस रक्तदान करून साजरा.
जळगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव महानगरात महारक्तदान शिबीर संपन्न. रक्तदान केल्याने माणुसकीची नाळ घट्ट होते - आमदार राजु मामा भोळे.
महा रक्तदान शिबिरात भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हा व आक्रमक सामाजिक संघटनेचा सक्रिय सहभाग.. लोकनेते, दूरदृष्टी असलेले निर्णयक्षम नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासाची नवी दिशा देणारे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त दि. २२ जुलै रोजी 'महा रक्तदान संकल्प' उपक्रमाचे आयोजन भाजपा प्रदेश अध्यक्ष आ. श्री रविंद्रजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जलसंपदा मंत्री श्री गिरीश भाऊ महाजन खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या नेतृत्वात जळगाव विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिराचे उद्घाटन जळगाव शहरांचे लाडके आमदार श्री राजु मामा भोळे भाजपा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष दिपक भाऊ सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. या विशेष दिवशी, समाजासाठी रक्तदान करण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह सर्वांनीच केला, रक्तदान हेच, सर्वश्रेष्ठ दान आहे कारण तुमच्या रक्ताच्या एका थेंबातून कुणाच्यातरी आयुष्याचा प्रकाश पुन्हा उजळू शकतो, सामाजिक बांधिलकी जपत विक्रमी संख्येने रक्तदान करूया हा केवळ एक उपक्रम नाही, तर जीवनदानाची चळवळ आहे. रक्तदान केल्याने माणुसकीची नाळ घट्ट होते असे आमदार श्री राजु मामा भोळे यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले.
भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर तर्फे शहरातील ५ मंडळात महा रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात भारतीय जनता पार्टी जळगाव महानगर जिल्हा तसेच भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे यांनी स्वतः रक्तदान करून पदाधिकारी व कार्यकर्तेंसह या राष्ट्रसेवेच्या पवित्र उपक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला रक्तदान दात्यांना त्याच ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने सर्टिफिकेट देण्यात आले उदयजी भालेराव सुभाष तात्या शौचे विशाल भाऊ त्रिपाठी माजी महापौर सिमाताई भोळे भारतीताई सोनवणे राजु भाऊ मराठे पिंटू काळे प्रकाश बालाणी यांच्या प्रमुख उपस्थिती तर मंडळ अध्यक्ष आनंद सपकाळे दिपमालाताई काळे अजित राणे विनोद मराठे अतुल बारी यांनी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे आक्रमक सामाजिक संघटना अध्यक्षा मंदाताई सोनवणे भाजपा वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी भरत भाऊ सपकाळे निलूआबा तायडे अनु जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनील जाधव उमेश देशपांडे राहुल संकट जब्बार खान जहांगीर खान
रविंद्र पाटील दिपक कोळी रत्नाताई बागुल योगिताताई शुक्ल सुमनताई मराठे गिताताई शुक्ला ज्योती गायकवाड जयाताई सोनवणे मालती तायडे गणेश बाविस्कर सचिन सपकाळे नारायण भाऊ पाटील भगवान जैतकर नामदार तडवी यांच्या सह पदाधिकारी, सक्रिय सदस्य, बंधू-भगिनीनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. सेवा ही संघटन अंतर्गत या सेवाभावी कार्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
प्रल्हाद सोनवणे
8421711919
No comments