adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्मृतीगंध ७९ रिवाइंड" सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

  स्मृतीगंध ७९ रिवाइंड" सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न  श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हे...

 स्मृतीगंध ७९ रिवाइंड" सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ च्या बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न 


श्रीरामपूर / प्रतिनिधी:

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चार दशके उलटून गेली, आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटांवर, जबाबदाऱ्यांच्या गर्दीत हरवून गेलेले दहावी १९७९ च्या बॅचचे विद्यार्थी "स्मृतीगंध ७९ - रिवाइंड" या सुंदर स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आले. हा केवळ एक कार्यक्रम नव्हे, तर शालेय आठवणींचा सुवर्णपुष्पगुच्छ ठरला.

शाळेतील काळ म्हणजे आपले जीवनातील सर्वात निरागस, निष्पाप आणि सुंदर क्षण. त्या दिवसात नक्की काय मिळालं हे लक्षात नसेल,पण "कोण" मिळालं हे मात्र कायम आठवतं, आणि हे "कोण" म्हणजे सर्व मित्र मैत्रिणी! हा  दिवस हा फक्त भेटीगाठींचा नाही, तर त्या आठवणींना उजाळा देण्याचा, त्या जुन्या मैत्रीला नव्या उमेदीने पुन्हा जपण्याचा ! यांतील काहींनी मोठे यश मिळवले, काहींनी संघर्षातून विजय मिळवला, आणि काहींना आयुष्याच्या साधेपणात आनंद सापडला. पण या सर्वांचं मूळ एकच अहिल्यानगर शहरातील "सिताराम सारडा विद्यालय" आहे,असे प्रतिपादन  भानुदास महानूर यांनी केले.


अहिल्यानगर येथील सिताराम सारडा विद्यालयाच्या १९७९ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा "स्मृतिगंध ७९ रिवाइंड" हा स्नेहमेळावा नुकताच कॅफे फरहत येथे मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ४६ वर्षांनंतर ४५  जुने वर्गमित्र एकत्र आले. चार दशके उलटल्यानंतर पुन्हा एकदा जुन्या मित्रांना भेटण्याचा आणि संवाद  साधण्याचा अनुभव सगळ्यांसाठीच भावुक आणि आनंददायक ठरला.

या अनोख्या भेटीमध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी आपल्या सुवर्ण आठवणींना उजाळा देताना, शालेय किस्से, बालसुलभ खोड्या आणि जुन्या गोष्टी शेअर केल्या. काही सहभागी सदस्यांनी मराठी व हिंदी गीते, तसेच भावस्पर्शी गजल सादर करून वातावरण अधिकच उत्साही व भावनिक केले. या स्नेहमेळाव्याच्या आयोजनासाठी भानुदास महानूर, युनुसभाई तांबटकर, कृष्णा काळे,संपत पितळे, किरण सोनग्रा,नरेंद्र गोयल आणि परमानंद तलरेजा या जुन्या विद्यार्थ्यांनी विशेष पुढाकार घेतल्या बद्दल त्यांच्या चमूचे सर्व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्यामुळे हा क्षण अविस्मरणीय बनला आहे. जीवनात कितीही पुढं गेलो, तरी शाळेच्या आठवणी म्हणजे मनाच्या दालनात जपलेलं सोनं आहे.आणि त्या सोन्याला पुन्हा उजाळा मिळाला.

या मैत्रीचा गंध असा अखंड दरवळत राहो, आणि आपण दरवर्षी असंच पुन्हा भेटत राहो, हीच शुभेच्छा अनेक मित्रांनी एकमेकांचा निरोप घेतांना व्यक्त केली.  कार्यक्रमाचा समारोप होऊच नये असं वाटत असतांना संध्याकाळी ५.३० वाजता सर्वांनी जड अंतःकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.

वृत्त विशेष सहयोग

ज्येष्ठ पत्रकार आबीद खान - अ.नगर

वृत्त प्रसिद्धी सहयोग

समता मीडिया सर्व्हिसेस 

 श्रीरामपूर - 9561174111

No comments