शहिद ब्रिगेडियर उस्मान जयंती निमित्त मख़दुम सोसायटी तर्फे मोफत वहया वाटप पाकिस्तानी सैन्यात सामील होण्यास ब्रिगेडियर उस्मान यांनी नकार दि...
शहिद ब्रिगेडियर उस्मान जयंती निमित्त मख़दुम सोसायटी तर्फे मोफत वहया वाटप
पाकिस्तानी सैन्यात सामील होण्यास ब्रिगेडियर उस्मान यांनी नकार दिला होता - डॉ.शमा फारुकी
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
ब्रिगेडियर मुहम्मद उस्मान हे भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झालेले भारतीय लष्कराचे अधिकारी होते. भारताच्या फाळणीच्या वेळी त्यांनी इतर अनेक मुस्लिम अधिकाऱ्यांसह पाकिस्तानी सैन्यात सामील होण्यास नकार दिला आणि भारतीय सैन्यात सेवा करत राहिले.
३ जुलै १९४८ रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना ते शहीद झाले. त्यानंतर त्यांना शत्रूचा सामना करताना दाखवलेल्या शौर्यासाठी भारताचे दुसरे सर्वोच्च लष्करी पदक "महावीर चक्र" ने सन्मानित करण्यात आले. असे प्रतिपादन मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या उपाध्यक्षा डॉ.शमा फारुकी यांनी केले.
शहिद ब्रिगेडियर मोहम्मद उस्मान यांच्या जयंतीनिमित्त मखदुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी तर्फे आलमगीर ता.नगर) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मोफत वह्या वाटप करण्यात आले.यावेळी मख़दुम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सचिव डॉ.कमर सुरुर, उपाध्यक्ष डॉ.शमा फारुकी, राजुभाई शेख, अकीला बाजी, मुख्तार शेख, मुख्याध्यापिका शेख जाकेरा,शेख नसरीन बानो, शेख शगूफता, सय्यद शाजिया, सय्यद रफअत,शेख शिरीन आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध बालगीते सादर केली. विद्यार्थ्यांना वह्यांसाठी वसंत पारधे,श्रीकांत सोनटक्के, डॉ.दमन काशीद,हेमंत नरसाळे, चारुता शिवकुमार, विका कांबळे,संजय भिंगारदिवे, अभय कांकरिया, राजुभाई शेख, डॉ.परवेज अशरफी,एड. गुलशन धाराणी आदिंनी सहकार्य केले.
मनोगत व्यक्त करताना डॉ. कमर सुरुर म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय जीवनातच देशासाठी बलिदान देणाऱ्या शहिदांबद्दल आपण काही न काही कार्यक्रमाच्या निमित्ताने माहिती दिली पाहिजे. जेणेकरून येणाऱ्या पिढीला स्वतंत्र सैनिकांबद्दल माहिती होऊन त्यांच्यासाठी आदर निर्माण होईल असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार राजुभाई शेख यांनी मानले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार आबीद खान ,अ.नगर
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर -:9561174111
No comments