Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी कारणेदाखवा नोटीस

  नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी कारणेदाखवा नोटीस भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भुसावळ -  तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. मंडळ...

 नामंजूर नोंदी मंजूर केल्याप्रकरणी कारणेदाखवा नोटीस



भुसावळ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुसावळ -  तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. मंडळ अधिकारी यांनी  वराडसीम, साकेगाव व गाेंंभी शिवारातील गटांवरील नामंजूर नोंद मंजूर करून आपल्या पदाचा गैरवापर केला, असा तक्रार अर्ज सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिला होता. या तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी आदेश उपविभागीय अधिकारी यांना देण्यात होेते. याप्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी प्रविण पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

माहिती अशी की तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. येथील मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण पाटील यांनी पदाचा गैरवापर करून वराडसीम गट नं. 382 नामंजूर नोंद 9562 व मंजूर नोंद 9567, साकेगाव शिवारातील गट क्र. 298/1/1/ब/2 वरील नोंद क्र.31359 अगोदर नामंजूर केली व त्याच गटातील 31492 नोंद मंजूर केली. तसेच गोंभी शिवारातील गट नं. 23 वरील नोंद नं.1383 नामंजूर करून 1385 व 1407 या नोंद मंजूर केल्या, असा तक्रारी अर्ज दि. 9 जून 2025 रोजी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिला होता. या अर्जाची दखल प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना  जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागाचे तहसीलदार विजय सुर्यवंशी यांनी दिले होते. त्यानुसार उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी पत्र क्र. अस्थाप/नोटीस/कावि/46/2025 दिनांक 2-7-25 अन्वये कुर्‍हे प्र.न. येथील मंडळ अधिकारी प्रविण लक्ष्मण पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.  नोटीसीत सदर बाब ही प्रशासकिय दृृष्ट्या अयोग्य असून याबाबतचा लेखी खुलासा ही नोटीस मिळाल्यापासून  24 तासाच्या आत माझ्या समक्ष सादर करावा, आपला लेखी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा खुलासा असमाधानकारक असल्यास आपणा विरूध्द महाराष्ट्र नागरि सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 मधील तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी, असे प्रांताधिकारी  यांनी नमुद केले आहे.

No comments