सततच्या संतधारपावसातही थांबले नाही कर्तव्य – मुख्याधिकारी राहुल पाटील यांचा घंटागाडीतून ३ तासांचा दौरा, नागरिकांच्या समस्या ऐकून दिलं दिला...
सततच्या संतधारपावसातही थांबले नाही कर्तव्य – मुख्याधिकारी राहुल पाटील यांचा घंटागाडीतून ३ तासांचा दौरा, नागरिकांच्या समस्या ऐकून दिलं दिलासादायक आश्वासन
चोपडा प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड
चोपडा शहरात मागील काही दिवसांपासून संतत धार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. भूमिगत गटारींच्या कामामुळे व नव्याने प्रस्तावित रस्त्यांच्या कामांमुळे अनेक भागांत नागरिकांना तात्पुरत्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पावसाळ्यात रस्त्यांवरील चिखल, गटारातील साचलेलं पाणी, व वाढती दुर्गंधी यामुळे नागरिकांच्या नाराजीचे स्वरही उमटत आहेत.
अशा कठीण परिस्थितीत, चोपडा नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राहुल पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या कार्यशैलीने विश्वासार्हतेचे नवे उदाहरण उभे केले. त्यांनी आज सकाळी घंटागाडीतून थेट शहराचा ३ तासांचा दौरा करत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
दौऱ्यात त्यांनी हे केले:
नागरिकांच्या तक्रारींवर थेट संवाद साधला.
रस्ते, गटार व पावसाच्या पाण्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे बारकाईने निरीक्षण केले.
ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे महत्व समजावून सांगितले व आरोग्याच्या दृष्टीने ते किती आवश्यक आहे, यावर नागरिकांना जागरूक केले.
प्रत्येक तक्रारीसंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले.
“भूमिगत गटारींच्या व रस्त्यांच्या कामामुळे सध्या निर्माण झालेल्या तात्पुरत्या अडचणींची आम्ही दखल घेतली आहे. या कामांमुळे लवकरच शहराला दीर्घकाळ टिकणारी स्वच्छता व चांगली सुविधा मिळणार आहे. नागरिकांनी संयम बाळगावा व स्वच्छतेसाठी ओला-सुका कचरा वेगळा करून प्रशासनाला सहकार्य करावे. प्रत्येक समस्या वेळेत निकाली काढली जाईल,” असे मुख्याधिकारी साहेबांनी सांगितले.
अशा प्रकारचा घंटागाडीतून प्रत्यक्ष दौरा करणारा मुख्याधिकारी हे दृश्य संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातील बहुतांश शहरांसाठीही नवीन व प्रेरणादायी ठरत आहे. कार्यालयाच्या चार भिंतीत न बसता थेट नागरिकांमध्ये उतरून समस्या समजून घेणे ही त्यांच्या कार्यपद्धतीची मोठी जमेची बाजू आहे.
आजचा दिवस पुन्हा एकदा दाखवून गेला – "नेतृत्व जर संवेदनशील असेल, तर अडचणींच्या पावसातही विकासाची पालवी फुलते!"
No comments