मध्यप्रदेशात आयशर वाहनातून जाणारे आठ क्विंटल चंदन शहर पोलिसांनी पकडले आठ क्विंटल चंदनासह आयशर गाडी असा एकूण अंदाजे २५ लाख ३० हजाराचा मुद्...
मध्यप्रदेशात आयशर वाहनातून जाणारे आठ क्विंटल चंदन शहर पोलिसांनी पकडले
आठ क्विंटल चंदनासह आयशर गाडी असा एकूण अंदाजे २५ लाख ३० हजाराचा मुद्देमाल जप्त
आरोपी वाहन चालकास शहर पोलीसांनी घेतले ताब्यात
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापुर:- शहर पोलिसांनी बुलढाणा रोडवरील वानखेडे पेट्रोल पंपानजीक बीड वरून बऱ्हाणपूर मध्य प्रदेश कडे जाणाऱ्या MH 16 AE 9616 हि आयशर मालवाहू गाडी संशयास्पद रीत्या जात असताना शहर पो.नि गणेश गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि सिंगारे,पो.हे.काॅ श्याम शिरसाट,पो.हे.काॅ श्याम कपले, पो.काॅ कैलास सोनोने,पो.काॅ दिलीप रोकडे,पो.काॅ आनंद माने यांनी गस्ती दरम्यान सदर वाहन शहर पोस्टेत आणले असता
त्या आयशर गाडीमध्ये अतिरिक्त कप्पा बनवून त्यात ठेवलेले सहा क्विंटल 29 किलो दीड फुटी चंदन गाभा, दोन क्विंटल चंदन गाभा चुरा असा एकूण आठ क्विंटल चंदनाचा मुद्देमाल किंमत अंदाजे 15 लाख 30 हजार रुपये व आयशर गाडी किंमत अंदाजे दहा लाख रुपये असा एकूण 25 लाख 30 हजार रुपयाचा मुद्देमाल वाहनचालक शे.जैनुद्दीन शे.अजीम वय 42 रा.नेकनुर ता.जि.बिड यास शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .या कारवाई साठी शहर पोलिसांनी वनपरिक्षेत्र अधिकारी के.डी पडोळ, वनपाल ए एम सपकाळ, वनरक्षक पी एन नारखेडे, आर.डी शिरसाट, वैभव पुंड वाहन चालक उपस्थित होते.
No comments