adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

भुसावळ शहरातील नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालय येथे तात्काळ मीटर बसविण्याबाबत निवेदन

 भुसावळ शहरातील नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालय येथे तात्काळ मीटर बसविण्याबाबत निवेदन  भुसावळ प्रतिनिधी (संपादक -:- हेमकां...

 भुसावळ शहरातील नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालय येथे तात्काळ मीटर बसविण्याबाबत निवेदन 


भुसावळ प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

भुसावळ येथील नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालयावर सोलर  पॅनल बसविण्यात आलेले असून मीटर नसल्यामुळे शहरवासियांना लाखो रूपयांचा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने याबाबत म.रा.वि.मं.चे कार्यकारी अभियंता यांना दि.23 जुलै रोजी निवेदनाद्वारे कार्यवाही करण्यासाठी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी मागणी केली आहे. तसेच कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

याबाबत भुसावळ येथील कार्यकारी अभियंता श्री.भामरे यांना दि.23 जुलै रोजी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, भुसावळ शहरातील नगरपालिका जलशुध्दीकरण केंद्र व नगरपालिका कार्यालय येथे तात्काळ मीटर बसविण्याबाबत निवेदन सादर केले. बर्‍याच दिवसापासून जलशुध्दीकरण  केंद्र व नगरपालिका कार्यालयावरती लाखो रूपये खर्च करून सोलर पॅनल बसविण्यात आलेले आहेत. मात्र सदरील ठिकाणी मीटर नसल्यामुळे  भुसावळकरांना लाखो रूपयांचा भुर्दंड होत आहे. तरी आपण तात्काळ मीटर बसविण्याचे आदेश देवून कारवाई करण्यात यावी, कारवाई न झाल्यास 15 ऑगस्टला आपल्या म.रा.वि.मं. या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता श्री.भामरे यांना समक्ष भेटून दिला आहे. तसेच याबाबत झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव मला देण्यात यावी, अशी विनंतीही श्री.सानप यांनी निवेदनात केली आहे.

No comments