बेलापूर महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम संपन्न श्रीरामपूर / प्रतिनिधी: (संपादक -:- हेमकांत गायकवाड) तालुक्यातील बेलापूर येथील बेलाप...
बेलापूर महाविद्यालयात एक पेड माँ के नाम उपक्रम संपन्न
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ' एक पेड माँ के नाम' हा उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप करून बेलापूर परिसरात वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे यांनी केले . सद्यस्थितीत बदलत्या हवामान बदलाचा परिणाम सजीव सृष्टीसह अन्य क्षेत्रांवरही होत आहे. अशा स्थितीत वृक्ष लागवड महत्त्वाची मानली आहे. जेणेकरून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. म्हणूनच एक पेड माँ के नाम हे राष्ट्रीय अभियान सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून सर्वांनी आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम धिकारी प्रा. रूपाली उंडे यांनी केले. तर प्रा.चंद्रकांत कोतकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक थोरात यांनी केले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments