जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसबेपाडा येथे माळेगाव केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवा...
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसबेपाडा येथे माळेगाव केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न
त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कसबेपाडा येथे शैक्षणिक वर्ष 2025-26 ची पहिली शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. सुरुवातीला उत्कृष्ट अशा सुरुची भोजनाचा आस्वाद सर्व शिक्षकांनी घेतला. त्यानंतर श्री. प्रवीण जाधव सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. केंद्राच्या केंद्रप्रमुख मॅडम श्रीमती सुनीता बच्छाव व शाळेचे व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामस्थांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. प्रतिमापूजनानंतर विद्यार्थ्यांनी सुमधुर अशा आवाजात ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. आलेल्या मान्यवरांचे पुष्प, पुस्तक ,पेन असे साहित्य देऊन स्वागत करण्यात आले. शिक्षण परिषदेमध्ये इयत्ता पहिलीचे मराठी भाषेचे पाठ्यपुस्तक परिचय हा विषय श्री. शिवाजी तमशेट्टे सरांनी, गणित पाठ्यपुस्तक परिचय श्री. नानासाहेब साळकर सरांनी तर इंग्रजी पाठ्यपुस्तक परिचय श्रीमती नयना वाघ मॅडम यांनी उत्कृष्टपणे समजावून दिला. शिक्षण परिषदेसाठी दुपार सत्रात आपल्या बीटाचे विस्तार अधिकारी श्री. विजय पगार साहेब व केंद्रप्रमुख श्रीमती सुनीता बच्छाव मॅडम यांनी प्रशासकीय विषयासंदर्भात मार्गदर्शन व सर्व शिक्षकांना शालेय कामकाजाच्या काही वैशिष्ट्यपूर्ण सूचना दिल्या.
आजच्या शिक्षण परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे एक सुंदर अशा वातावरणात आजची शिक्षण परिषद पार पडली. जिवापाड मेहनत घेऊन शाळेचे रूप परिवर्तन करणारे श्री. बदादे सर व श्रीमती. माधुरी चव्हाण मॅडम यांनी उत्कृष्टपणे सर्व गोष्टींचे छान नियोजन केलेले होते. यात राजवीहिरपाडा व लव्हाळीपाडा या शाळेच्या श्रीमती सौंदानकर मॅडम व प्रवीण अहिरे सर, देवरे मॅडम व प्रवीण जाधव सर यांनीही उत्कृष्ट असे सहकार्य केले.
शेवटी श्री बदादे सर यांनी आपल्या शाळेची यशोगाथा सर्व शिक्षकांसमोर मांडली या यशोगाथेतून खरंच खूप प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे. छोट्या छोट्या सहभागातून शाळेचा व विद्यार्थ्यांचा विकास कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कसबेपाडा शाळा होय. अशाच छोट्या छोट्या योगदानातून आपल्या केंद्रातील सर्व शाळा सुंदर आकर्षक व गुणवत्ता पूर्ण शिक्षण भविष्यात नक्कीच देतील अशी खात्री आपण आपले वरिष्ठ पगार साहेब व बच्छाव मॅडम यांना देऊयात.
आयोजक तिघही शाळांचे मनःपूर्वक धन्यवाद.
No comments