भूमी फौंडेशन संस्थेचे गरजू शेतकऱ्यांच्या मुलींसाठी उत्कृष्ट कार्य - प्रदीप छल्लाणी भूमी फौंडेशन महाराष्ट्र च्या वतीने रुग्णवाहिका चालकांचा...
भूमी फौंडेशन संस्थेचे गरजू शेतकऱ्यांच्या मुलींसाठी उत्कृष्ट कार्य - प्रदीप छल्लाणी
भूमी फौंडेशन महाराष्ट्र च्या वतीने रुग्णवाहिका चालकांचा सन्मान
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भूमी फौंडेशन महाराष्ट्र या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांच्या मुलींसाठी उत्कृष्ट कार्य केले जात असल्याचे प्रतिपादन शहरातील प्रख्यात व्यापारी प्रदीपसेठ छल्लाणी यांनी केले. येथील संगमनेर रोडवरील व्हीआयपी रेस्ट हाऊस याठिकाणी रुग्ण वाहिका चालक सन्मान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
अपघातग्रस्त असो,आजारी असो, ह्रदयविकार आदी काहीही असो परंतु आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णास रुग्णालयात वेळेवर पोहोचवतात यामुळे रुग्णावर तातडीने उपचार होतात आणी हजारो रुग्णांचे प्राण वाचविले जातात,असे रुग्णांचे प्राण वाचविणारे श्रीरामपूर तालुका परिसरातील रुग्णवाहिका चालकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रारंभी संस्थेचे मार्गदर्शक प्राचार्य टी. इ . शेळके, श्रीरामपूर तालुका आरोग्य अधिकारी मोहन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब मगरे, नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर, नायब तहसीलदार बाबासाहेब गोसावी,माजी तहसीलदार गुलाबराव पादीर, वैद्यकीय अधिकारी योगेश बंड, उद्योजक प्रदीप छल्लाणी, संस्थापक डॉ. कैलास पवार, डॉ. बाबुराव उपाध्ये, अनिल औताडे, सुकदेव सुकळे आदी मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रास्तविक व स्वागत संस्थापक अध्यक्ष डॉ.कैलास पवार यांनी केले व आपल्या भूमि फौंडेशनच्या सामाजिक कार्याचा आढावा सांगितला. तथा इतर ठिकाणी देखील असेच उपक्रम राबविणार येणार असल्याचे यावेळी सांगितले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य टी.इ. शेळके होते,
यावेळी महत्वाची कामगिर बजावणारे परिसरातील शासकीय चालक दत्तात्रय दळवी, क्र. १०८ वाहन चालक राहुल जाधव, राहुल वाकचौरे, १०२ वाहन चालक किरण खाजेकर, जनसेवा अम्ब्यूलन्स चंद्रकांत कदम, रेड क्रॉस सोसायटी अब्दुल पठाण, शिरसाठ हॉस्पिटल - मुश्ताकभाई शेख,संजीवनी हॉस्पिटल- दिनेश साळवे, छत्रपती अम्ब्यूलन्स - शाम हेलकुटे, रवी देवगिरे, स्वर्गरथ -सतीश चव्हाण, कार्डोयक अम्ब्यूलन्स - सुबोध नवगिरे, जिजामाता - ऋषिकेश बंड, जीबेरा पडांगळे, नगर परिषद, देवकीनंदन अम्ब्यूलन्स - प्रदीप दिवे, सुभाष दिवटे, अम्ब्यूलन्स - सतीश पवार, देवळाली प्रवरा - पप्पू कांजने, नगर परिषद - मनोज शर्मा, संतोष रासकर, स्वर्गरथ गुलाटी - विशाल सोनवणे, पढेगांव पीएचसी - सुधाकर खरात, बेलापूर पीएचसी बेलापूर -संतोष शेलार, टाकळीभान- अनिल दाभाडे,उंदीरगांव -सुभाष नाईक, खैरी निमगाव - चंद्रकांत ढोबने, माळवाडगांव- रमेश मोरे अशा २९ रुग्णवाहिका चालकांचा त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवून सन्मान करण्यात आला. त्यावेळी नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर,डॉ. मोहन शिंदे, श्रद्धानंद महाराज, अनिल औताडे, पत्रकार स्वामीराज कुलथे, प्राचार्य शेळके, आदींनी मनोगत व्यक्त करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी सुदामराव औताडे, डॉ प्रकाश मेहेकरकर, डॉ शंकरराव गागरे,शिवाजीराव बारगळ, सुभाष गायकवाड, कचरू महांकाळे,भीमराज बागुल, भूमि फाऊंडेशन चे राज्य प्रसिद्धी प्रमुख ज्येष्ठ पत्रकार बी.आर. चेडे, पत्रकार राजेंद्र देसाई, बबन ताके आदी उपस्थित होते. सूत्र संचालन प्रसन्ना धुमाळ यांनी व आभार प्रदर्शन डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी केले.
वृत्त विशेष सहयोग
ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
No comments